Home Breaking News काव्यकुंज -शब्द हेच खरे धन

काव्यकुंज -शब्द हेच खरे धन

349

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

काव्यकुंज -शब्द हेच खरे धन
◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️

◻️▪️शब्द हेच खरे धन
शब्द देती तो आधार
मन असता उदास
शब्द पहा ते सुंदर //१//

◻️▪️शब्द बोलता प्रेमाणे
येई हसू ओठावरी
मन होई ते आनंदी
खुले कळी गालावरी //२//

◻️▪️शब्द हेच खरे धन
शब्द जोडी नाते घट्ट
असे सदैव सोबती
सदा पुरवी ती हट्ट //३//

◻️▪️शब्दांनीच जडे नाते
मना मनाचे सुंदर
शब्दांनेच चढे पारा
शब्द असे तलवार //४//

◻️▪️शब्दांचीच अनामिक
ओढ मनाला असते
शब्द असे असे धन
ज्याने नाते ते खुलते //५//

🔳कु. मंगल शामराव मिसाळ🔳 काव्यकुंज सहज सुचलं ◻️◻️सदस्य ठाणे◻️◻️◻️