Chandrapur dist@ news
•जिल्हा निर्मिती साठी नागभिडकर उतरणार मैदानात
• उच्च न्यायालयात जनहित याचिका करणार दाखल
सुवर्ण भारत: किरण घाटे(वेब पोर्टल न्यूज़)
चंद्रपूर:नागभिड जिल्ह्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा नागभिडकर मैदानात उतरणार आहेत.स्थानिक जनता कन्या विद्यालयाचे माजी प्राचार्य हरिचंद्र मेहर यांच्या अध्यक्षतेखाली व झेप निसर्ग मित्र संस्था नागभिडच्या वतीने काल मंगळवारी आयोजित झालेल्या नागभिड जिल्हा संघर्ष समितीच्या एका बैठकीत नागभिड जिल्हा निर्मिती संदर्भात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
नागभिड हे ठिकाण भौगोलिक,समाजिक,सांस्कृतिक दृष्टया सर्व सोयी युक्त मध्यवर्ती ठिकाण असून नागपूर,वर्धा,यवतमाळ, अमरावती,भंडारा, गोंदिया व गडचिरोली या प्रमुख जिल्ह्यानां जोडणारा महत्वाचा दुवा असून निकषानुसार जिल्हा निर्मिती होण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या ठराव एकमताने पारित करण्यात आला असल्याचे एका युवा कार्यकर्याने या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.
बैठकित जिल्हा मागणी संदर्भातील नागभीड व्यापारी संघाचा ठराव या शिवाय नागभिड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायंतीचे ठराव, ग्रामसंघाचे ठराव, विविध समाजिक संघटना,संस्था,पतसंस्था, बचत गट, यांचे ठराव घेण्याचे ठरले आहे सोबतच विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन जिल्हा मागणी बाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणे,निवेदने देणे असे निर्णय घेण्यात आले.सदरहु सभेच्या अध्यक्षस्थानी मेहर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे,ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकृष्ण देव्हारी,भाऊराव डांगे, मनोज रडके,रमेश ठाकरे, पत्रकार अरुण गायकवाड यांच्यासह विविध समाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागभिड व्यापारी संघ, स्थानिक पातळीवरील अनेक राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते,सेवाभावी संघटनेंचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




