Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर येथे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर संपन्न

Ballarpur city@ news • बल्लारपूर येथे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर संपन्न

250

Ballarpur city@ news

• बल्लारपूर येथे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर संपन्न

बल्लारपूर :- स्थानीय महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणावर दिनांक ५ मे ते २१ मे २०२३ पर्यंत बल्लारपूर स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन च्या वतीने उन्हाळी व्हॉलीबॉल शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बल्लारपूर स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव प्रमोद आवते यांच्या मार्गदर्शनात व्हॉलीबॉल या खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण खेळाडूंना द्यावे या हेतूने हा समर कॅम्प घेण्यात आला. व्हॉलीबॉल सोबतच लांब उडी, गोळाफेकचे मार्गदर्शन सुनील मांझी यांनी दिले. कराटेचे प्रशिक्षण संजय कुबडे यांनी दिले. योग नृत्याचे प्रशिक्षण गोपालजी यांनी दिले. योगा प्रशिक्षण संजय पारधी यांनी दिले.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्यअधिकारी विशाल वाघ उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष लखन सिंह चंदेल तसेच माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा आणि बल्लारपूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी पूनमचंद डाँवर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिराची माहिती बी.एस.ए चे सचिव प्रमोद आवते आणि भाजपा शहर अध्यक्ष व बी. एस. चे अध्यक्ष काशीनाथ सिंह माहिती दिली.

त्यानंतर अतिथींचे मार्गदर्शन झाले, शेवटी मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी अध्यक्षीय भाषण केले. मोबाईल आणि टीव्ही पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी हा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले.

या शिबिरामध्ये एकूण १०५ खेळाडूंचा सहभाग होता त्यामध्ये मुले मुली व बालगोपालांचा सहभाग होता. शिबिरामध्ये भाग घेणाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील तसेच माजी नगराध्यक्ष समाजसेवक लखन सिंह चंदेल यांच्या तर्फे मोलाचे सहकार्य मिळाले.

बल्लारपूर स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांनी कठोर परिश्रम घेऊन या शिबिराला यशस्वी केले. प्रज्वल आवते, मिलिंद दारुंडे, श्लोक, मंथन आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने हे शिबिर व्यवस्थित पार पडले. पुढच्याही वर्षी असेच शिबिर त्याच मैदानावर घेण्याचे बल्लारपूर स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरविलेले आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.