• काव्यकुंज -स्वरचित कविता
-ऋण आई वडिलांचे
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
♻️ ऋण आई वडिलांचे
आहे अनंत जीवनी
त्यांच्या मुळेच लाभतो
मज आनंद जीवनी //१//
♻️ जन्म दिला माऊलीने
जन्मा अर्थ वडिलांनी
त्यांच्या मुळेच सन्मान
मिळे मज या जीवनी //२//
♻️ आई वडिलांचे ऋण
फिटता फिटणार नाही
त्यांच्या कष्टांचे मोल
कधीच विसरणार नाही //३//
♻️ आई वडिलांनी दिला
जन्म हा अनमोल
करू त्यांचा आदर
जीवन करू सफल //४//
♻️ जाणू त्यांच्या शब्दांचे मोल
त्यांच्यामुळेच आहे ओळख
नाही तर आयुष्यात
पसरला असता काळोख //५//
◼️◻️कु. मंगल शामराव मिसाळ ◻️काव्यकुंज सहज सुचलं ◻️सदस्य ठाणे
