Home कृषी Chandrapur@ city news • निशुल्क आरोग्य शिबिराने वाढदिवस साजरा • मोंटो...

Chandrapur@ city news • निशुल्क आरोग्य शिबिराने वाढदिवस साजरा • मोंटो मानकर यांनी दाखवले सामाजिक दायित्व

254

Chandrapur@ city news
• निशुल्क आरोग्य शिबिराने वाढदिवस साजरा

• मोंटो मानकर यांनी दाखवले सामाजिक दायित्व

चंद्रपूर :- आजचा युवक आपला वाढदिवस पार्टी, नाचं, गाणे, धिंगाणा तर कुणी मित्रांसोबत भररस्त्यात मोठमोठे केक कापून साजरा करतात परंतु काही सुशिक्षित युवक समाजाप्रती आपले काही देणे घेणे आहे या विचाराने आपले सामाजीक दायित्व निभावत सामाजिक उपक्रम राबवितात, असाच आपला वाढदिवस चंद्रपूर येथील पठाणपुरा वार्डात राहणारे मोंटो मानकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

चंद्रपूर शहरातील पठाणपुरा वार्डात राहणारे उच्चशिक्षित मोंटो मानकर यांनी वाढदिवसाच्या दिवशी पठाणपुरा वार्डातील मिलिंद बुद्ध विहारात भव्य निःशुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन केले यात ब्लडप्रेशर, शुगर व रक्त तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत, सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे अध्यक्ष तथा ओबीसी जनगणना समन्वय समितीचे अध्यक्ष बळीराज धोटे, सफेद झेंडा कामगार सेनेचे अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा घुग्गुस चे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांची उपस्थिती होती. या आरोग्य शिबिराचा लाभ पठाणपुरा वार्डातील शेकडो नागरिकांनी घेतला.

शिबिर यशस्वी करण्याकरिता अंकुश खरतड, वैभव खनके, प्रज्वल हस्ते, प्रथम मून, असित मून, माशुक नळे, अंशुल वनकर, वंशू वाघमारे, राकेश चहारे, निखिल पाटील, कशिष उमरे, महिणी मून, विशाल चिवंडे, प्रा. दुष्यांत नगराळे , करण मून, धम्मदिप बांबोळे, रेखा रामटेके, पवित्रा ताकसांडे, अनिता मून, नालंदा नळे आदी उपस्थित राहून सहकार्य केले.