Home Breaking News Chandrapur city@ news • माहवारी कप महिलांसाठी महा संजीवनी कप : सौ.चंदा...

Chandrapur city@ news • माहवारी कप महिलांसाठी महा संजीवनी कप : सौ.चंदा वैरागडे

250

Chandrapur city@ news
• माहवारी कप महिलांसाठी महा संजीवनी कप : सौ.चंदा वैरागडे

चंद्रपूर :- माहवारी कप महिलांसाठी महा संजीवनी कप असून महिलांच्या मासिक पाळी च्या संदर्भात त्यांच्यामध्ये माहवारी कप ची जनजागृती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सौ.चंदा मनोज वैरागडे अध्यक्ष रणरागिणी महिला नागरी सह. पतसंस्था बाबूपेठ यांनी केले .वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर च्या वतीने बाबूपेठ येथील शहर प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित माहवारी कप मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमात उपस्थित आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांना संबोधित करीत होत्या.
चंद्रपूर शहरामध्ये महिलांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडचे फार मोठे प्रदूषण होत आहे.आणि त्यावर मात करण्यासाठी पर्यावरण पूरक , सर्वसामान्य महिलांना परवडणारा , दीर्घकाळ टिकणारा ,महिलांच्या वैयक्तिक आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम न असणाऱ्या अशा माहवारी कप ची जनजागृती वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने संपूर्ण चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामधील आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता आणि आरोग्य सेविका यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य संस्थेने हाती घेतले असल्यामुळे त्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सौ.चंदा वैरागडे यांनी केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून सौ.चंदा मनोज वैरागडे अध्यक्ष रणरागिनी पतसंस्था बाबूपेठ , वारी संस्थेच्या सचिव प्रियंका वैरागडे ,सहसचिव स्नेहल अंबागडे शहर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शुभांकर पीदुरकर, योगशिक्षिका रेखाताई वैरागडे मंचावर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये शहर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण २३ आशा कार्यकर्ता आणि १० आरोग्य सेविका यांनी सहभाग घेतला. चंद्रपूर शहरांमध्ये माहवारी कप ची जनजागृती करणाऱ्या १०० योद्धांना मोफत माहवारी कप वाटप करून संस्थेच्या वतीने पुरस्कृत केल्या जाईल. अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष विजय खनके यांनी केली.
कार्यक्रमाला वारी संस्थेचे गणेश पोहाणे , अर्चना उरवेते ,सोनाली पोहाणे ,पूजा लाकडे , सुचिता येनुरकर ,सोनाली पोहाणे , मयुरी बालपांडे, प्रतिभा मोगरे , रिद्धी पोहाणे, दीपिका चन्ने , रितिका चन्ने व मुख्य मार्गदर्शिका प्रियंका वैरागडे यांनी अथक मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.