Home Breaking News • काव्यरचना -बाबा

• काव्यरचना -बाबा

298

• काव्यरचना -बाबा

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

बाबा आपला परिवार मोठा
कसं चालविला हो संसाराचा गाडा
संसारात पडल्यावर कळले हो मला
तू गेल्याने सुनसान झाला वाडा

आम्ही बहीण भाऊ सर्व लाडाचे
मन जपता जपता परवड तुझी
नाही कधी चेहऱ्यावर शिकस्त
शेंडेफळ म्हणुनी जोडी तुझीमाझी

भरपूर पैसा नसूनही इज्जत मूल्य
सर्व समस्यांना धावून आलास
संकटांना तारतो तोच मायबाप
बाबा का तू लवकर गेलास

बाबा म्हणुनी साद घालीते
तुझ्या अस्तित्वाचा भास मला
आईसोबत बाबांची सुदंर जोडी
सदा कल्याणाची होती जाण तुला

▪️◻️सौ. शैला चंद्रकांत चिमडयालवार ◻️▪️◻️सहज सुचलं काव्यकुंज सदस्य सावली जि.चंद्रपूर