Home Breaking News Bhadravati taluka@ news • लग्न सोहळ्याची अभिनव लग्नपत्रिका ! • पत्रिका...

Bhadravati taluka@ news • लग्न सोहळ्याची अभिनव लग्नपत्रिका ! • पत्रिका ठरली चर्चेचा विषय!

686

Bhadravati taluka@ news
• लग्न सोहळ्याची अभिनव लग्नपत्रिका !

• पत्रिका ठरली चर्चेचा विषय!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

भद्रावती तालुक्या मधील ऐतिहासिक असलेल्या सातवाहनकालीन चंदनखेडा येथील समाज परिवर्तनाची जाण असणारे व सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असणारे माजी उपसरपंच विठ्ठल हनवते व तळमळीचे युवा कार्यकर्ते तथा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शालीक हनवते यांनी आपली पुतणी आचल हनवते हिच्या लग्ना प्रित्यर्थ काढलेली अनोखी लग्नपत्रिका सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. आचल व क्रिष्णा यांचा ‘विवाह सोहळा हा ‘आदिवासी पारंपरिक पद्धतीने मुलनिवासी आदिवासी महासभेच्या विचारधारणे प्रमाणे संपन्न होणार आहे.

सदर लग्नपत्रिकेतुन ‘समाजसेवा, मूल्य शिक्षण, आरोग्य,पर्यावरण रक्षण, यातूनच होईल राष्ट्राचे रक्षण ‘ असा संदेश त्यांनी या पत्रिकेतून दिला असल्याचे दिसून येते. याच लग्नपत्रिकेतुन, शासकीय व सामाजिक उपक्रमांना चालना देत, पर्यावरण वाचवा, राष्ट्रीय स्वच्छता अभियानाला गती देण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता म्हणजे
‘ रोजचा क्षण नाहीतर आजार पण , एक कदम स्वच्छता की और , पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, मानवता हाच धर्म असुन,एकमेका रक्तदान, नेत्रदान करा.’ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी म्हणत ‘झाडे लावा झाडे जगवा ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ’ असे एक नाही तर अनेक संदेश आपल्या संकल्पनेतुन विठ्ठलजी हनवते व मनोहर हनवते यांनी पुतणीच्या लग्नपत्रिकेतुन दिले आहे.
जबाबदार पालकाचे एकच लक्षण मुलाचे आरोग्य व पूर्ण शिक्षण,’जय जवान जय किसान ‘ शेतकरी जगाचा पोशिंदा आपला शेतकरी , ग्रामगीतेतील ओवीना तसेच राष्ट्राच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणा-या अनेक महापुरुषांना विठ्ठलजी हनवते व मनोहर हनवते यांनी आपल्या पुतणीच्या लग्नपत्रिकेत स्थान देवून समाजा पुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.हे मात्र तितकेच खरे आहे.