Home Breaking News ◻️ काव्यकुंज ◻️सावित्री◻️

◻️ काव्यकुंज ◻️सावित्री◻️

263

◻️ काव्यकुंज ◻️सावित्री◻️

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

सायेब लई लवकर आलात
विचारपूसं करायला
येळ निघून गेल्यावर
मदतीचा हात द्यायला◻️ ◻️◻️◻️◻️पंधरा वरीस झालं माझ्या धन्याला फासावर जाऊन
दुष्काळानं रान करपलं
‌‍‌ तसा संवसार गेला जळून
कोरड्या आभाळालाही
नाही फुटला पाझरं
किती दिसं वाहणार मी
दुःखाची ही घागर
सोन्यासारख्या पोरांकडं बघून जगण्याचं बळ आलं
गेला कुंकवाचा धनी तरी
मागं नाही पाहिलं
गळालेली कंबर
मी पुन्हा एकदा कसली
जमिनीत पाय रोवून
मी कधी नाही खचली
सायेब शेतकऱ्याच्या बायकांना नसतो आत्महत्या करायचा अधिकार
संवसाराचा आरधा गाडा
तीच फरपटत वढणारं
साहेब गेल्या साली
पोरीचं लगीन केलं
पोरगं कलक्टर होतया
कष्टाचं चीज झालं
पई पईनं कर्ज फेडलं
पाटलाचं देन सारलं
अन सायेब आता आलात व्हय मदतीला?
लई उपकार झालं सायेब नको तुमची मदत
इतक्या दिसं आमच्या कडं देव व्हता बघायला
माफ करा सायेब हात जोडून सांगते
ज्यांना गरज आहे त्यांना येळेवर जा मदतीला
माझ्यासारखी येळ
आता नको कोणत्या आया बहिणीला
♦️अश्विनी सुभाष दीक्षित♦️ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य