Home Breaking News आरएनआयकडून दिलासा! महिनाभराने वाढली यासाठी तारिख…जाणून घ्या काय आहे नविन तारीख…

आरएनआयकडून दिलासा! महिनाभराने वाढली यासाठी तारिख…जाणून घ्या काय आहे नविन तारीख…

435

आरएनआयकडून दिलासा! महिनाभराने वाढली यासाठी तारिख…जाणून घ्या काय आहे नविन तारीख…

नवी दिल्ली – वृत्तपत्रांना सन 2022-23 या कालावधीसाठी वार्षिक विवरण ई-फायलिंगच्या अंतिम तारखेस आरएनआयकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वृत्तपत्रांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. यापुर्वी 31 मे 2023 पुर्वी वार्षिक विवरण दाखल करणे आवश्यक होते आता आरएनआयच्या नव्या सुचनेनुसार प्रकाशक हे 30 जून 2023 पर्यंत वार्षिक विवरण दाखल करू शकणार आहेत.
आरएनआयच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, पीआरबी कायदा 1867 च्या कलम 19 डी अंतर्गत 2022-23 या कालावधीसाठीच्या वार्षिक विवरण ई-फायलिंग करण्याची अंतीम तारिख 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तसेच ई-फायलिंग संदर्भात चौकशी व तक्रारीसाठी प्रकाशक 01124369981 अथवा 01124363241 या क्रमांकावर व्हॉटसअप द्वारे कामाकाजाच्या दिवसांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधू शकता.
दरम्यान, या ईमेल आयडीवरही संपर्क साधण्याचे आवाहन आरएनआयकडून करण्यात आले आहे. डेप्युटी प्रेस रेजिस्ट्रार रजिथ चंद्रन एम आर यांनी ही सूचना 23 मे रोजी जारी केली आहे.