Home Breaking News • ट्रकने प्रवास करत राहुल गांधींनी जाणून घेतल्या चालकांच्या समस्या, व्हिडीओ व्हायरल

• ट्रकने प्रवास करत राहुल गांधींनी जाणून घेतल्या चालकांच्या समस्या, व्हिडीओ व्हायरल

207

• ट्रकने प्रवास करत राहुल गांधींनी जाणून घेतल्या चालकांच्या समस्या, व्हिडीओ व्हायरल

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

राहुल गांधींचा ट्रक प्रवासाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ज्याची चर्चा चांगलीच होते आहे. राहुल गांधी दिल्लीहून शिमला या ठिकाणी गेले होते. अंबाला ते चंदीगढ या भागात त्यांनी ट्रक प्रवास केला.

राहुल गांधी यांनी अंबाला या ठिकाणाहून ट्रकने प्रवास सुरुवात केली आणि चालकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर केला आहे.

त्या म्हणतात विद्यापीठातले विद्यार्थी, खेळाडू, नोकरदार वर्ग, नोकरी साठी तयारी करणारे युवक, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमध्ये जाणारे सामान्य नागरिक आणि आता अर्ध्या रात्री ट्रक ड्रायव्हर्सशी संवाद का साधत आहेत राहुल गांधी? कारण त्यांना या सगळ्यांचा आवाज ऐकायचा आहे.

या सगळ्या वर्गांना काय समस्या भेडसावत आहेत? ते राहुल गांधी जाणून घेत आहेत.

आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत असा विश्वास राहुल गांधी यांनी प्रत्येकाला दिला आहे.