Home Breaking News Chandrapur dist@ news • राजूरा पटवारी भवनाचा उद्घाटन सोहळा येत्या ४ जूनला!...

Chandrapur dist@ news • राजूरा पटवारी भवनाचा उद्घाटन सोहळा येत्या ४ जूनला! • एसडीओ संपत खलाटे, तहसिलदार हरीश गाडे , बाळकृष्ण गाढवे ,संजय अनव्हानेंसह अनेक मान्यवर मंडळींची राहणार उपस्थिती !

47

Chandrapur dist@ news
• राजूरा पटवारी भवनाचा उद्घाटन सोहळा येत्या ४ जूनला!

• एसडीओ संपत खलाटे, तहसिलदार हरीश गाडे , बाळकृष्ण गाढवे ,संजय अनव्हानेंसह अनेक मान्यवर मंडळींची राहणार उपस्थिती !

सुवर्ण भारत:किरण घाटे (सहसंपादक)

चंद्रपूर: विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील राजूरा येथे विदर्भ पटवारी संघ राजूरा उपविभागाच्या वतीने (पदाधिकारी व सदस्यगणांच्या अथक परिश्रमातून) भव्य वास्तू उभारण्यात आली असून या नवनिर्मित पटवारी भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा येत्या 4 जूनला सकाळी 12वाजून 15 मिनिटांनी होत आहे.उपरोक्त कार्यक्रमाला उद्घघाटक म्हणून विदर्भ पटवारी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजूरा उपविभाग पटवारी संघटनेचे अध्यक्ष किशोर कुलकर हे विभूषित करणार आहे .

सदरहु आयोजित पटवारी भवन उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राजूराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व तहसिलदार हरीश गाडे उपस्थित राहणार आहेत.याच कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विदर्भ पटवारी संघटनेचे सरचिटणीस संजय अनव्हाने , सहसचिव गजानन भागवत , कोषाध्यक्ष विजय बोराखडे , चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे, सचिव संपत कन्नाके उपस्थित राहणार असल्याची माहिती राजूरा उपविभाग पटवारी संघटनेचे उपाध्यक्ष अमोल गोसाई यांनी या प्रतिनिधीस आज दिली .

होवू घातलेल्या या भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्या प्रसंगी जिवतीचे तहसिलदार दिपक वजाळे ,कोरपनाचे प्रभारी तहसिलदार विनोद डोनगांवकर , सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, हनुमंत अंदनकर , वसंतराव मून ,रविन्द्र खोब्रागडे, सेवानिवृत्त तलाठी रमेश सुर सुभाष शास्त्रकार, चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेचे उपाध्यक्ष धनराज पारसे, कोषाध्यक्ष परमेश्वर उगलमूले सहसचिव दिपक गोहणे ,यांचे सह पटवारी संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
आयोजित या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील पटवारी व मंडळ अधिकारी बांधवांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन राजूरा उपविभाग पटवारी संघाचे उपाध्यक्ष अमोल गोसाई , सचिव लक्ष्मिकांत मासिरकर, कोषाध्यक्ष सतिश मिटकर ,व सचिव परवेज शेख यांनी केले आहे.