Home विदर्भ Ballarpur city@ news • ओडिशा रेल्वे दुर्घटना ! • रेल्वे...

Ballarpur city@ news • ओडिशा रेल्वे दुर्घटना ! • रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा :राजू झोडेंची मागणी !

49

Ballarpur city@ news

• ओडिशा रेल्वे दुर्घटना !
• रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा :राजू झोडेंची मागणी !

सुवर्ण भारत: किरण घाटे(सहसंपादक)

बल्लारपुर:ओडिशातील बालासोरमध्ये तीन ट्रेनची भीषण टक्कर झाली. या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या २३३ वर पोहोचली आहे. तर जखमींचा आकडा ९००वर गेलेला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बहानागा रेल्वे स्टेशनजवळ शालीमार – चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन, १२८६४ बेंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एक मालगाडी अश्या तीन ट्रेनची टक्कर झाली.त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व मृतकांच्या नातेवाईकांना भरघोस मदत करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज यांनी केली आहे.

दरम्यान काल ओडिशामध्ये मोठी भीषण दुर्घटना घडली. मागील काळात डोकावून पाहिले तर रेल्वे अपघातांचे प्रमाण हे सातत्याने वाढले आहे. यात मृत्यूंची आकडेवारी हादरवणारी आहे. एकीकडे बुलेट ट्रेन आणि वंदे भारत सारख्या रेल्वेच्या माध्यमातून आपण आधुनिकीकरण करत आहोत मात्र दुसऱ्या बाजूला अश्या प्रकारचे भीषण अपघात घडत आहेत.त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील राजू झोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.