Home Breaking News Chandrapur city@ news • शासनाच्या नविन रेती धोरणा प्रमाणे रेती...

Chandrapur city@ news • शासनाच्या नविन रेती धोरणा प्रमाणे रेती उपलब्ध करण्याची मागणी: देवेंद्र बेले

89

Chandrapur city@ news
• शासनाच्या नविन रेती धोरणा प्रमाणे रेती उपलब्ध करण्याची मागणी: देवेंद्र बेले

चंद्रपूर :-शासनाच्या नविन वाळू ( रेती ) धोरणा प्रमाणे चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना योग्य प्रकारची रेती उपलब्ध करण्याची मागणी विदर्भ किसान मजदुर काँग्रेस चंद्रपूर ने निवेदन द्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.
महाराष्ट्र शासनाने यावर्षी पासून अनधिकृत रेती उत्खननाला पायबंद घालण्यासाठी व नागरिकांना बांधकामासाठी योग्य दरात रेती उपलब्ध करून देण्यासाठी नविन वाळू (रेती) धोरण राबविण्याचे ठरविले व त्यानुसार ते धोरण प्रत्येक जिल्हयात राबविणे सुरू केले आहे. वर्धा, अहमदनगर. छत्रपती संभाजी नगर, नाशिक, हिंगोली, नागपूर व भंडारा इत्यादी जिल्हयातील शासकिय रेती डेपो वरून रेती विक्रिला सुरूवात झाली आहे. या प्रक्रियेत नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन वाळू मागणीची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे. या धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असलेल्या बांधकामाकरीता लागणा-या रेतीसाठी “महाखनिज” यासंकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे सोय आहे ६००/- रू प्रति ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होत आहे.

चंद्रपूर जिल्हयात वर्धा, ईरई, झरपट, अंधारी, उमा, वैनगंगा इत्यादी नद्या व काही मोठे नाले आहेत ज्यांच्या २५ पेक्षा जास्त वाळू घाटातून वाळूचे उत्खनन केले जाते. महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हयात ११ रेती डेपो नियोजित केले असून त्यातून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या वाळूच्या गरजू नागरिकांना प्रति ब्रास ६०० रू ( रू १३३ प्रति मेट्रिक टन) शासकिय दराने पुरवठा करण्याचे शासकिय धोरण आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार मात्र चंद्रपूर जिल्हयात महाराष्ट्र शासनाचा शासकीय धोरणाप्रमाणे वाळू डेपोतून नागरिकांना शासकिय दराने वाळूचा पुरवठा करने अद्याप सुरू झाले नाही.

चंद्रपूर जिल्हयात नविन वाळू धोरण सुरू झाल्यास अवैद्य वाळू उत्खननाला आळा बसेल व शासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडणार नाही. तसेच शासकिय बांधकामे मोठया प्रमाणात सुरू आहेत.त्यांना केंद्र व राज्य सरकार कडून अनुदान मिळालेल्या रमाबाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवाज योजना व ईतर योजना मार्फत घर बांधकाम करायचे आहे. पण रेती मुळे बांधकामे बंद आहे.
गरजू नागरिकांना वाळूचा पुरवठा योग्य दराने शासकिय वाळू डेपो मधून सुरू करण्याची मागणी विदर्भ किसन मजदुर काँग्रेस चे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक मनपा देवेंद्र बेले, जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापुरे यांनी केले आहे.