Ghugus city@ news
• घुग्घुस लाॅईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगातील अस्थायी कामगाराचे वेतन करार
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस:घुग्घुस लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापक व भारतीय लाइट्स मेटल कामगार संघ यांच्यात अस्थायी कामगाराचे वेतन करार व परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) करार मागील १५ महिण्यापासुन सविस्तर चर्चात्मक बैठक सुरू होती.
दि.२० जून २०२३ मंगळवार रोजी परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA),वेतन करार संपुष्टात आले,व परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA)करार दि.१ एप्रिल २०२४ पासुन लागू होईल. पुढील ५ वर्षांकरिता म्हणजेच २०२४ ते २०२९ पर्यंत राहील.
या बैठकीत भा.ला.मे.का.सं.घुग्घुस अध्यक्ष देवराव निंदेकर,संघटक मंत्री अशोकराव मांडवकर, कार्याध्यक्ष प्रमोद येलचलवार, महामंत्री हिवराज बागडे, संयुक्त महामंत्री राजास्वामी जंगम तसेच कंपनीचे मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम, सीएसआर व्यवस्थापक तरूण केसवाणी, प्रितम आगदारी तसेच वेतन करार सदस्य कार्यकारणी उपस्थित होते.
