Home Breaking News Ballarpur city@ news • युवक काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील कराटे स्पर्धेतील...

Ballarpur city@ news • युवक काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील कराटे स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

189

Ballarpur city@ news
• युवक काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील कराटे स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील कराटे स्पर्धकांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले.
अखिल भारतीय कराटे स्पर्धेचे आयोजन खालसा महाविद्यालय अमृतसर, पंजाब करण्यात आले होते. त्यात बल्लारपूर नालंदा क्रीडा मंडळ संस्कार व्यायामशाळा आणि नालंदा क्रीडा मंडळ कराटे क्लबच्या मुलांनी नेत्रिपदक कामगिरी करत पदक प्राप्त केले.

या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील कराटे खेळाडूंची निवड करण्यात आले होते. १०/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ या कालावधीत झालेल्या स्पर्धेत यश भयालाल कोरे याने १४ वर्षे वयोगटात सुवर्णपदक जिंकले तसेच कुमिती मध्ये शाखा पदक पटकावले. भास्कर संजय गुघलोत याने १६ वर्षे वयोगटात काता आणि कुमिती याला दोन रौप्य पदक, वरिष्ठ गटात सदा कैलास भीमनवार वय २५ वर्षे याने काता मध्ये रौप्यपदक व कूमिती मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. द्रिष्ट सुनील कांबळे वय ४ वर्ष याने एक सुवर्ण पदक जिंकले.चारही खेळाडूंनी चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक मिळवला.
या खेळाडूंचा बल्लारपूर विश्रामगृह येथे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात युवा काँग्रेस राज्य सहसचिव चेतन गेडाम व माजी नगर सेवक विनोद आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शंकर महाकाली, युवक काँग्रेस बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, एनएसयूआय अध्यक्ष दानिश शेख, शहराध्यक्ष अरविंद वर्मा, युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष अजय रेड्डी, उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, सोशल मीडिया अध्यक्ष संजय घुग्लोत,शहराध्यक्ष उद्योग काँग्रेस करण कामटे, शहर सचिव रवी जैस्वाल, जिशान सिद्दीकी, रोहित खान, गोपाल कलवाला, सोनू आमटे, , संजू सुद्दला, आकाश वर्मा, आचार्य माकोडे गोपाल कलवल सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व यशाचे श्रेय खेळाडूंनी त्यांचे पालक आणि त्यांचे कराटे प्रशिक्षक सुनील कांबळे यांना दिले.