Home Breaking News Ghugus city@ news • उर्जावान कार्यकर्ता हीच भाजपची शक्ती! – जिल्हाध्यक्ष देवराव...

Ghugus city@ news • उर्जावान कार्यकर्ता हीच भाजपची शक्ती! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “मेरा बुथ-सबसे मजबूत” संवाद कार्यक्रमाचे आयोजन.

52

Ghugus city@ news
• उर्जावान कार्यकर्ता हीच भाजपची शक्ती! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

• ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “मेरा बुथ-सबसे मजबूत” संवाद कार्यक्रमाचे आयोजन.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस, दि. २७ जून
मोदी@9 महा-जनसंपर्क अभिमानाच्या पार्श्वभूमीवर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, विश्वगौरव मा. नरेंद्रजी मोदी यांनी आज सकाळी भोपाळ (मध्य प्रदेश) येथून “मेरा बूथ सबसे मजबूत” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांशी जाहीर संवाद साधला. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.

“मोदीजींचे आजचे संबोधन देशभरातील समस्त भाजप कार्यकर्त्यांसाठी नवी उर्जा व प्रेरणा देणारे होते.
कार्यक्रमाच्या समारोपात बोलताना” जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, तळागाळातील उर्जावान कार्यकर्ता हीच खऱ्या अर्थाने भाजपची शक्ती आहे. आपला बुथ केंद्र सशक्त झाला तरच पक्ष मजबूत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या एकुणच मार्गदर्शनात त्यांनीही भाजपच्या संघटनात्मक प्रगतीसाठी बुथ कार्यकर्त्याचे असलेले महत्व अधोरेखित केले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील १७२४ बूथ प्रमुखांनी यासोबतच ४६२ शक्ती केंद्र प्रमुखांनी उर्वरित बुथ सशक्तिकरण अभियान पुर्ण करण्याबरोबरच अन्य संघटनात्मक कार्यक्रमांचे बुथ स्तरावर नियमित आयोजन व एकत्रीत येत संवाद साधणे महत्वाचे आहे.

यासोबतच, “मेरा बुथ सबसे मजबूत” या घोषवाक्यानूसार आपली जबाबदारी ओळखून सर्वांनी बुथ केंद्र सशक्त करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे. असे आवाहन ही त्यांनी जिल्हाभरातील बूथ प्रमुखांना केले.
यावेळी जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री विजय आगरे, माजी ग्रा. पं. सदस्य साजन गोहने, रत्नेश सिंह, विनोद जंजर्ला, गणेश कुटेमाटे, राजेश मोरपाका, सुनील बाम, प्रवीण सोदारी, सचिन कोंडावार, उत्तम आमडे, शाम आगदारी, सुरेंद्र जोगी, तुलसीदास ढवस, राजेंद्र लुटे, चिंचोळकर महाराज, वमशी महाकाली, कोमल ठाकरे, शरद गेडाम, असगर खान, राजू रामटेके, जगन्नाथ धोटे, संतोष सिंग, हेमंत पाझारे, अभिषेक लिहीतकर, राजू चौधरी, रमेश गजगंटी, कुणाल सरोज, संघर्ष कोकरे, रोहित गोरे, राजू बोड्डू, विनोद कांबळे, प्रमोद कांबळे, चंद्रभान कडसकर, रामचंद्र लांजेवार, चंदन वर्मा, नामेश्वर निहाल, रवी सूर्यवंशी, प्रणय शेंडे, ओम निकुरे, नंदू खामणकर, आदित्य रोहनकर, रोशन पानघाटे, रोहित जैस्वाल, रमेश कट्टेकोला, निखिल पाटील आदिंसह मोठ्या संख्येने स्थानिकांची सोबत उपस्थिती होती.