Home Breaking News Thane dist @news • ओम साई शिक्षण संस्था संचालित एस. एम....

Thane dist @news • ओम साई शिक्षण संस्था संचालित एस. एम. जी.विद्यामंदिर माध्यमिक विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात साजरा !

117

Thane dist @news

• ओम साई शिक्षण संस्था संचालित एस. एम. जी.विद्यामंदिर माध्यमिक विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात साजरा !

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

ठाणे:मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एस.एम.जी.विद्यामंदिर दिवा येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.सदरहु शाळेचा या वर्षीचा एकूण निकाल ९८.५८ टक्के लागला असून ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले १० विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त केलेले ५६ विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये ५८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये २१ विद्यार्थी तर पास श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.ही या शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

परीक्षेत प्रथम क्रमांकाची मानकरी कु. श्वेता रामदास सावरतकर ही ठरली आहे. तिला ९४ टक्के गुण मिळाले, द्वितीय क्रमांकाची कु. पालकर श्रावणी दिपक पालकर हिने ९३.४० टक्के प्राप्त केले आहे.तर तृतीय क्रमांक कुमार सार्थक संदिप शिंदे या विद्यार्थ्याने पटकाविला आहे.त्याने या परीक्षेत ९२.४० टक्के प्राप्त केले आहे.

यासर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष मारूती गायकर , शाळेचे सचिव स्वप्निल गायकर शाळेच्या मुख्याध्यापिका सानिका सरपोळे या शिवाय मंगल मिसाळ, संदिप वाघेरे, सरोजिनी कवडे, अर्चना वरंखंडे आरूषी शिगवण, प्रेरणा तांबे, सतिश भारती , ज्ञानेश्वर केदारे व अन्य शिक्षकवृंदांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुष्प गुच्छ,व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले यावेळी उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद उपस्थित होते. स्वप्निल गायकर यांनी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करीत त्यांना पुढील शैक्षणिक यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या.

मुख्याध्यापिका,व शिक्षकवृंदांनी देखिल त्यांना या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या .या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी हे यश संपादन करण्यासाठी परीक्षेपूर्वी कशी तयारी केली हे या वेळी बोलताना सांगितले.शेवटी या विद्यार्थ्यांसाठी एवढेच म्हणावे लागेल कि
“अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती”.