Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस शहर वारकऱ्यांच्या भक्तीने सजले •...

Ghugus city@ news • घुग्घुस शहर वारकऱ्यांच्या भक्तीने सजले • आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीची मिरवणूक

190

Ghugus city@ news

• घुग्घुस शहर वारकऱ्यांच्या भक्तीने सजले

• आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीची मिरवणूक

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : जनाबाई निमकर यांच्या घरापासून आषाढी एकादशीनिमित्त गुरुवार, २९ जून रोजी सकाळी विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याहस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीची पूजा करण्यात आली. भजन, कीर्तन, हरीनामाच्या गजराने घुग्घुस शहर दुमदुमून गेले. विठ्ठल मंदिरात पूजा करून पालखीची मिरवणूक गांधीचौक, विद्या टॉकीज, उसगाव मार्गे वढा येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात समाप्त करण्यात आली.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जनाबाई निमकर, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, सिनू इसारप, साजन गोहणे, चिन्नाजी नलभोगा, संजय भोंगळे, ललित होकम, प्रवीण सोदारी, किशोर नागतुरे, राजेश मोरपाका, सतीश बोन्डे, सिनू कोत्तूर, संदेश पोलशेट्टीवार, सुनील राम, दिनेश बांगडे, राजेंद्र लुटे, माया मांडवकर, सखुबाई बोबडे, संध्या जगताप, सुचिता लुटे, वैशाली ढवस, वैशाली चिकनकर, सुशीला डकरे, लक्ष्मी चांदेकर व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.