Home Breaking News Chandrapur @city news • ती लग्न पत्रिका होत आहे व्हायरल..!

Chandrapur @city news • ती लग्न पत्रिका होत आहे व्हायरल..!

906

Chandrapur @city news
• ती लग्न पत्रिका होत आहे व्हायरल..!

सुवर्ण महाराष्ट्र:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:- चंद्रपूर येथे होत असलेल्या एका लग्नाची पत्रिका होत आहे व्हायरल.
चंद्रपूर येथील उच्च शिक्षित नवरदेवाने लग्नपत्रिकेत “मोफत वीज आमचा अधिकार आहे”, अशा शब्दात त्यांनी जनहित असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुल तालुक्यातील नवेगाव भुजला या छोट्याश्या गावातील “लहानुजी बालाजी दुर्गे” (सेवा निवृत्त शिक्षक) यांच्या मुलाने म्हणजेच अजय सुनीता लहनुजी दुर्गे ( अलद.) या उच्चशिक्षित तरुणाने समाज प्रबोधना करीता आपल्या लग्न पत्रिकेला एक वेगळेच स्वरूप दीले आहे.
नवेगाव भूजला या छोट्याश्या गावातील असून सध्या चंद्रपूर येथे स्थायिक झालेल्या सामजिक बांधिलकी आणि समाजासाठी काहीतरी देणे असते या विचारातून त्याच्या होत असलेल्या १ जुलै २०२३, च्या विवाहाच्या पत्रिकेत,
“आम्ही वीज उत्पन्न करतो मग मोफत वीज आमचा अधिकार”…! असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अजय सुनीता लहानूजी दुर्गे आणि ममता मल्लेश पानेम यांचा विवाह एक जुलै होत आहे. विवाह म्हंटले की पत्रिका छापावे लागते. पण अजय सुनीता लहानुजी दुर्गे यांनी “रक्तदान, वृक्षरोपण, रेन हार्वेस्टिंग संबंधी जनजागृती करीत स्लोगन द्वारे आपल्या लग्न पत्रिकेत केली आहे. वर वधू दोघे ही उच्च शिक्षित असून अजय दुर्गे हा “एम.ए (राज्यशास्त्र, इंग्लिश), एम.एस.डब्लू. पास असुन, पॉलिटिकल विषयात पीएचडी साठी ची असणारी PET परीक्षा सुद्धा पास आहे . सध्या तो शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथे एल.एल.बी. ची परीक्षा देत आहे.
तर वधू ही पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे. त्यांनी आपल्या विवाह पत्रिकेत “छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा”, यांचा विचाराचा आदर्श ठेवून ‘ “मी प्रथमता आणि अंतत: भारतीयच आहे” असे घोष वाक्य लिहिले आहे. सोबत प्रत्येक भारतीयांना संविधानाचे महत्व समजले पाहिजे या करिता भारतीय संविधान ची उद्देशपत्रिका पत्रिकेतील छापली आहे.
“शहरात असणारा रक्ताचा तुटवडा बघून आणि त्या मुळे फक्त आणि फक्त गरिबांची होणारी धूळधाण,फसगत हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून स्वयं स्फूर्तीने दर तीन महिन्यांनी एकदा तर वर्षात चार वेळ रक्तदान करावे. असा सोजवळ विंनतीपुर्न जनहित असणारा मोलाचा आणि गंभीर विषय मांडला आहे.
पृथ्वी चे होणारे पर्यावरणीय बदल आणि त्यामुळे प्रभावित होणारे जनजीवन, हे कुठे तरी कमी होईल या उद्देशाने पर्यावरण संवर्धनाकरीता प्रत्येकाने वृक्षारोपण करावे आणि नुसते झाडे लावून मोकळे न होता त्याचे संगोपन करावे या करीता जनतेला आव्हाहन केले आहे.
प्रत्येक दिवशी शहरातच नव्हे तर संपूर्ण पृथ्वी तालावर पिण्याचा पाण्याचा जाणवणारा कमी साठा त्या मुळे वाढते जल संकट, हे टाळण्याकरीता रेन वॉटर हार्वेस्टिंग चा उपयोग करुण पावसाचे पाणी जमिनीत मुरवून , जमीनितील पाण्याची पातळी वाढवावी. असा योग्य सल्ला जनतेस केला आहे .
वरील दोन्ही संकल्पना चंद्रपूर चे विकास पुरुष मंत्री मान. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर महानगर पालिकेद्वारे महनगर पालिकेचे आयुक्तांनी शहरातील नागरिकांना आव्हाहन केले होते . यावर काम करीत हे मुद्दे घरा घरात पोहोचले पाहिजे, त्या साठी एकट्या वर मुलाने आपल्या पत्रिके द्वारे हजारो लोकांपर्यंत हा विषय पोहोचवून चंद्रपूर महानगर पालिकेचे काम अगदी मोफत करून सुजाण नागरिक होण्याचे कर्तव्य निभावले आहे.
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये आम्ही वीज उत्पन्न करतो, त्या साठी प्रदूषण आम्ही सहन करतो , त्या साठी दूषित पाणी आम्ही पचवतो, त्यातून उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना आम्ही सामोरे जातो मग, “मोफत विज आमचा मूलभूत अधिकार आहे… ! अश्या विषयाला आधीच जनतेपर्यंत नेणारे चंद्रपूर चे आमदार मान. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मागणीला दुजोरा दिला आहे.
या सर्व बाबींचा विचार करायला वर अजय सुनीता लहानुजी दुर्गे उर्फ अलद जनतेला सांगत आहे.
अजय दुर्गे , स्वतः “दी हेल्पिंग हॅण्डस विजय फाउंडेशन”चंद्रपूर. या गरजू , गरीब , सामान्य लोकांना मदत करणाऱ्या आणि मोफत रक्त पुरवठा करणाऱ्या ग्रुप चा संस्थापक अध्यक्ष आहे. या द्वारे तो आणि त्याची संपूर्ण टीम रोज शहरातील अनेको लोकांना मदत पोहोचवत असते.
अश्या नावीन्य पूर्ण, काहीतरी वेगळा जनतेच्या फायद्याच्या गोष्टी सांगणाऱ्या लग्नाच्या पत्रिकेची दखल नागरिक घेतांना आणि त्यावर समाधान कारक चर्चा करतांना दिसत आहेत.