Home Breaking News Ghugus city@news • घुग्घुस शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

Ghugus city@news • घुग्घुस शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

299

Ghugus city@news

• घुग्घुस शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:घुग्घुस शहरात गुरुवार, २९ जून रोजी सकाळी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

जामा मशीद येथे नमाज संपल्यानंतर भाजपा नेत्यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद उल अजहा इस्लामिक दिनदर्शिकेत एक महत्वाचा सण मानला जातो.
बकरी ईदच्या दिवशी जनावरांची कुर्बानी देण्याची परंपरा आहे. बकऱ्याची कुर्बानी देऊन त्याचे मास गरिबांना वाटप करण्याची परंपरा आहे. परंतु या वर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी साजरी करण्यात येत असल्याने सामाजिक बांधिलकी जोपासून मुस्लिम बांधवांनी बकऱ्याची कुर्बानी दिली नाही.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, उप विभागीय अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, जामा मशीद कमेटीचे सदर इफ्तेखार अहमद, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, साजन गोहणे, विनोद चौधरी, हसन शेख, मोनीन शेख,हेमंत आनंदराव पाझारे, तुलसीदास ढवस, प्रवीण सोदारी, सुरेंद्र जोगी, संदेश पोलशेट्टीवार, शफी शेख व मुस्लिम बांधव उपस्थित होते.