Home Breaking News Chandrapur dist@ news • जिल्हाधिका-यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या वन विभागावर कारवाई होणार...

Chandrapur dist@ news • जिल्हाधिका-यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या वन विभागावर कारवाई होणार काय? • राजु झोडेंचा सवाल

123

Chandrapur dist@ news
• जिल्हाधिका-यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या वन विभागावर कारवाई होणार काय?
• राजु झोडेंचा सवाल

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर:अतिक्रमणधारीत जबरान ज्योत शेतकऱ्यांच्या संदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी जो पर्यंत शेतकऱ्यांनी शासनाकडे सादर केलेल्या दाव्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतजमीनीवर वनविभागाने अतिक्रमण किंवा जोर जबरदस्ती करू नये असा आदेश पारित केला. जिल्हाधिकारी यांनी त्यांचे पत्र क्रमांक/महा.सह/ राखीव वनपेसा /वनहक्क का.वी 318 /223 दिनांक 24 /5/ 2023 च्या पत्रानुसार आदिवासी विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक याचिका 2016 प्रकरण १२४ /का/ १४ दिनांक 11 /11/ 2016 अन्वये अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक व वननिवासी सुधारणा नियमानुसार नियम 15 अन्वये अपील केलेल्या अर्जावर जिल्हास्तरीय वनहक्क समितीद्वारे जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत वन विभागाने दावेदारांच्या भोगवट्यातील वनभूमीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करू नये असा आदेश या पूर्वीच दिलेला आहे.
त्याचप्रमाणे जे दावे उपविभागीयस्तरीय वनहक्क समितीकडून मंजुरी प्रदान करून जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. त्यांना जिल्हास्तरीय वन हक्क समितीकडे पुन्हा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून कारवाई पूर्ण होणे शिल्लक आहे. अशा दाव्यांची उपविभागीय स्तरीय वन हक्क समिती तसेच जिल्हास्तरीय वन हक्क समितीकडून खातरजमा करणे शिल्लक आहे अशा बाबतीत खातर जमा न करता कोणतीही कार्यवाही न करण्याबाबत निर्देश आपल्या स्तरावरून आपले अधिनस्त वनाधिकारी यांना पुनश्च देण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतरही उपरोक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करून काही वन अधिकारी हेतू परस्पर काही शेतकऱ्यांना त्यांची जमीन खाली करण्याबाबत जोरजबरदस्तीने त्यांना धमकावून भीती दाखवून त्यांचेवर दडपण आणीत आहे तद्वतच अतिक्रमण हटवण्याचे कृत्य करीत आहे जेव्हा की ही सर्व बाब वनमंत्री यांना देखील माहित आहे आणि तरी पण त्यांच्याकडून यावर अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कृत्य थांबवण्याबाबत कोणतेही प्रयत्न किंवा आदेश देण्यात आलेली नाही. यावरून असे लक्षात येते की वनमंत्री व वन अधिकाऱ्यांच्या संगणमताने अश्या प्रकारची कृत्य करण्यात येते काय ?असा सवाल राजु झोडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित केला.

जर अशाच प्रकारे गोरगरीब शेतकऱ्यांच्या वनजमिनीवर वनविभाग अन्याय करत असेल तर या विरोधात उलगुलान संघटना व सर्व शेतकरी वनमंत्री यांच्या गृह कार्यालयात जाऊन जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत वनमंत्र्यांच्या गृह कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला . पत्रकार परिषद मघ्ये राजु झोडे, सुभाष ताजने, विठ्ठल लोनबले,सुमित्रा रायपूरे,देशकुमार खोब्रागडे, उत्तम पारखी, संजय भड़के, सोमेश्वर मंडावी, गुरुदास मेश्राम, किशोर खोब्रागडे, दत्तात्रेय कावळे आदीं उपस्थित होते.