Home Breaking News Chandrapur taluka@ news • आ. किशोर जोरगेवारांनी घेतले वढा...

Chandrapur taluka@ news • आ. किशोर जोरगेवारांनी घेतले वढा येथील विठ्ठलाचे दर्शन !

145

Chandrapur taluka@ news

• आ. किशोर जोरगेवारांनी घेतले वढा येथील विठ्ठलाचे दर्शन !

सुवर्णभारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर: देवशयनी आषाढी एकादशी निमित्त काल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील वढा येथील तीर्थक्षेत्राला भेट देत त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी शेतक-यांना सुख समृद्धी देण्याची मनोकामना केली.

दर्शना दरम्यान यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, शहर संघटक विश्वजित शहा, ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, सतनाम सिंग मिर्धा, निलिमा वनकर, रुपा परसराम, वंदना हजारे, कविता निखारे, प्रमिला बावणे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूरातील धार्मिक स्थळांना महत्व प्राप्त करुन देण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहे.

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यात पोहचावी यासाठी आपण महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. याला लाभलेला लोकसहभाग ऐतिहासिक आहे. यासोबतच वढा तिर्थक्षेत्रही आपल्याला धार्मिक आणि पर्यटनदृष्टा विकसीत करायचे आहे. त्या दृष्टीने शासनस्तरावर माझे प्रयत्न सुरु आहे. यात गावक-यांचाही सहभाग लागणार आहे. हे ठिकाण विकसीत झाल्यास वढा गावाचे धार्मिक महत्व वाढणार असुन रोजगारांच्या संधीही ग्रामस्थांना मिळणार असल्याचे आ.जोरगेवार यावेळी म्हणाले. त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन नागरिकांच्या सुदृढ आरोग्याची प्रार्थना केली.