Home Breaking News Chandrapur city@ news • उद्योग शिबिर उच्चशिक्षित समाजसेवी मोंटो मानकर...

Chandrapur city@ news • उद्योग शिबिर उच्चशिक्षित समाजसेवी मोंटो मानकर यांनी लोकांना उद्योजक बनवून नवीन आदर्श निर्माण केला.

243

Chandrapur city@ news

• उद्योग शिबिर उच्चशिक्षित समाजसेवी मोंटो मानकर यांनी लोकांना उद्योजक बनवून नवीन आदर्श निर्माण केला.

सुवर्ण भारत:उपसंपादक
✍️ किरण घाटे

चंद्रपूर:स्वतःचा व्यवसाय सुरू करुन उद्योजक बना व लोकांना रोजगार द्या.
मोंटो मानकर यांनी दिनांक 25-6-2023 रोजी मिलिन्द बुध्द विहार, पठानपुरा वॉर्ड इथे आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत कृषी विभागाची महत्वकांशी योजना याचे शिबिर आयोजित करण्यात आले. या योजने मार्फत गरजूंना बँकेच्या माध्यमातून 1 ते 40 लाख पर्यन्त लोन व तसेच 35 % सबसिडी देण्यात येत आहे.

लोकांनी स्वतः चा व्यवसाय सुरू करावा व उद्योजक बनावे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.
जवळपास 50 च्या वर लोकांनी उद्योजक बनण्याचा निर्धार केला व या योजनेमार्फत स्वतः चा व्यवसाय सुरू करणार आहेत.

आटा चक्की उद्योग, पापड निर्मिती उद्योग, चिप्स निर्मिती उद्योग व ईतर 41 प्रकार चे उद्योग या योजनेमध्ये आहे.
या कार्यक्रम ला यशस्वी बनवण्यासाठी अंकुश खरतड, प्रफुल चौधरी, विक्रांत वाघमारे, सुधीर गवळी, प्रथम मून यांनी सहकार्य केले.