Home Breaking News Chandrapur dist@ news • मागणी दिनाचे औचित्य साधत येत्या ४ जूलैला राज्य...

Chandrapur dist@ news • मागणी दिनाचे औचित्य साधत येत्या ४ जूलैला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन ! • कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी व्हावे :दिपक जेऊरकर यांचे आवाहन

128

Chandrapur dist@ news
• मागणी दिनाचे औचित्य साधत येत्या ४ जूलैला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन !
• कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी व्हावे :दिपक जेऊरकर यांचे आवाहन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अद्याप कायम आहे .परंतु त्यासोबतच इतरही मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे केलेल्या बेमुदत संपाचा परीणाम सर्वदूर महाराष्ट्रात अद्याप टिकून असल्याचे एकंदरीत दिसून येते. कर्मचारी-शिक्षकांच्या या अतुट एकजुटीच्या विराट दर्शनामुळे कर्मचारी-शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निश्चित मार्गी लागतील अशा एका विशिष्ट अपेक्षेची निमिर्ती राज्यभर झालेली आहे. त्याच अनुषंगाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासोबतच इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या हेतुने मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 ला देशव्यापी मागणी दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारी कर्मचारी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी या प्रतिनिधीस आज चंद्रपूर मुक्कामी बोलताना सांगितले.

प्रलंबित मागण्या दोन स्तरावर असून राज्य स्तरावर 1) जुनी पेन्शन व अन्य 17 मागण्यां शासनाला सादर करण्यात आल्या आहेत. अर्थ, सा.प्र.वि, शिक्षण विभागाशी संबंधित मागण्या. 2) पीएफआरडीए कायदा रद्द करा, आठव्या वेतन आयोगाचे गठन करा, कंत्राटी व अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी घातलेल्या अटी-शर्ती रद्द करा, खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, कामगार-कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच करु नका, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करा या मागण्या केंद्र शासन स्तरावर प्रलंबित आहेत.

उपरोक्त मागण्यांसदर्भात लक्ष वेधण्यासाठी दिनांक 4 जुलै 2023 ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान या मागण्यां संदर्भातील घोषणा देऊन निदर्शने करण्यात येणार आहे .हे आंदोलन 100% यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी उपस्थीत राहावे असे आवाहन राज्य सरकारी संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजु धांडे, कोषाध्यक्ष संतोष अतकारे, तसेच संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.