Home Breaking News Chandrapur city @news • महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्याचा संकल्प :आ....

Chandrapur city @news • महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्याचा संकल्प :आ. किशोर जोरगेवार • शेकडों महिलांना दिले ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण • चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडचा उपक्रम

77

Chandrapur city @news
• महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्याचा संकल्प :आ. किशोर जोरगेवार
• शेकडों महिलांना दिले ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण
• चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडचा उपक्रम

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:महिलांच्या सक्षमीकरणासाठी चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमचे प्रयत्न सुरु आहे. शहरातील विविध भागात महिलांसाठी स्वयंरोजगारा संबधित विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सुरु असून स्थानिक भिवापूर वार्डातील शेकडों महिलांनी ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ घेतला याचा आनंद आहे.

स्वयंरोजगारातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने आमचे हे यशस्वी पाऊल असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भिवापूर वार्ड येथे होतकरु महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आज प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाने या प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशु फुलझले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, महिला आणि विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेऊन या घटकांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी मतदार संघातील विविध भागात आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत. या शिबिरांमध्ये महिलांना होणाऱ्या आजारांवर उपचाराकरिता विशेष डाॅक्टरांची चमु आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठीही मध्यवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिकत असलेल्या शिक्षण संस्थांना संगणक लॅब उपलब्ध करुन देत या संस्था बळकट करण्याचे प्रयत्नही आमच्या वतीने सुरु असल्याचे यावेळी ते म्हणाले.

स्पर्धेच्या युगात सर्वांना रोजगार मिळणे कठीण आहे. त्यामुळे आता स्वयंरोजगाराकडे कल वाढविण्याची गरज आहे. सध्या ब्युटी पार्लर, मोबाईल रिपेअरिंग, शिवणकाम याचे प्रशिक्षण महाग आहे. सर्व साधारण कुटुंबाला हे प्रशिक्षण परवडण्यासारखे नाही. त्यामुळे आपण मतदार संघात असे नि:शुल्क प्रशिक्षण शिबीरे आयोजित करत महिला व युवकांना प्रशिक्षीत करण्याचा संकल्प केला आहे. या अंतर्गत आता पर्यंत आम्ही जवळपास दोन हजार महिलांना शिवणकाम व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले आहे.

तर पूढे 5 हजार महिलांना प्रशिक्षीत करण्याचा आमचा संकल्प असल्याचे आ.जोरगेवार यांनी सांगितले. कार्यक्रमात प्रशिक्षीत झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी महिला व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.