Home Breaking News • काव्यकुंज- धुंद तुझ्या आठवणीत! वैशाली राऊत,नागपुर

• काव्यकुंज- धुंद तुझ्या आठवणीत! वैशाली राऊत,नागपुर

361

• काव्यकुंज- धुंद तुझ्या आठवणीत!
• वैशाली राऊत,नागपुर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◽रात्रीचाही दिवस होतो
धुंद तुझ्या आठवणीत
सुखद क्षणांची गर्दी करून
स्वप्न दाटतात पापणीत.

◽मनी लागे हुरहूर
तुझ्या भेटीची जेव्हा
धुंद होऊन रमते
तुझ्या आठवणीत तेव्हा.

◽असते पंख मला तर
उडले असते वाऱ्यासवेत
क्षणात येवून जवळ
घेतले असते तुला कवेत.

◽येवून तुझ्या जवळ
विसावले असते छान
होवून धुंद तुझ्यात
विसरले असते भान.
◽▪️वैशाली राऊत, सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ◽▪️नागपूर▪️जिल्हा नागपूर