Home Breaking News Yavatmal dist@ news • माथोली, जुगाद गाव आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या भक्तीने गुंजले

Yavatmal dist@ news • माथोली, जुगाद गाव आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या भक्तीने गुंजले

114

Yavatmal dist@ news
• माथोली, जुगाद गाव आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या भक्तीने गुंजले

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

यवतमाळ:२९ जुन २०२३ गुरुवार सकाळ रोजी आषाढी एकादशीनिमित्त कैलाश नगर येथे वारीचे आयोजन करण्यात आले,या वारीत कैलाश नगर शिव मंदिर ते यवतमाळ जिल्ह्य़ातील प्रसिद्ध हेमाडपंथी काळातील शिव मंदिर जुगाद विठ्ठल, रुक्मिणीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
या वारीत टाकळी येथील भजन मंडळ व कैलाश नगर, जुगाद, माथोली, चिखली, सावंगी येथील सर्व भजन मंडळ व भक्तजन एकत्रित येऊन हि वारी माथोली, कैलाश नगर, साखरा ते जुगाद पायदळ वारी काढण्यात आली होती,तसेच काढलेली वारी अतिशय आनंदाने पार पडली,परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व महिलांच्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते,विठू माऊलींच्या दर्शना सोबतच महादेवाचे दर्शन ही करण्यात आले व शिवमंदिर येथे भजन ही झाले व पालखी सोहळा पूजास्थान करून समारंभ करण्यात आले.
यावेळी या पायदळ वारीत माथोलीचे सरपंचा ज्योतीताई माथुलकर, साखरा येथील सरपंच निलेश पिंपळकर, टाकळीचे सरपंच ज्ञानेश्वर टोंगे, गणेश रोडे, बालाजी उपासे,प्रमोद अर्जुनकर, विश्वास बोरपे, विजय पिंपळकर, संध्याताई पारखी,सुमित ढवस, कुणाल डोये, निलेश बलकी, निलेश पानघाटे, अतुल चिने, बबलू बोबडे,सुनील माथुलकर व मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.