Home Breaking News Chandrapur city@ news •परिक्षा शुल्क कमी करा या प्रमुख मागणीसाठी विविध सामाजिक...

Chandrapur city@ news •परिक्षा शुल्क कमी करा या प्रमुख मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांचे चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर ! • विद्यार्थ्यांना ही शुल्क न परवडणारी • अनेक युवक युवती राहतील या परिक्षेपासून वंचित!

181

Chandrapur city@ news
•परिक्षा शुल्क कमी करा या प्रमुख मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांचे चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर !
• विद्यार्थ्यांना ही शुल्क न परवडणारी
• अनेक युवक युवती राहतील या परिक्षेपासून वंचित!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी संवर्गातील एकूण ४६६४ पदाच्या सरळ सेवा करीता जाहिरात जमाबंदी आयुक्त आणि पुणे संचालक भूमिअभिलेख कार्यालया मार्फत जाहीर करण्यात आली आहे.तदवतंच महाराष्ट्र राज्यातील एकंदर ३६जिल्ह्यांच्या केन्द्रावर ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे समजते.सदरहु पदभरतीची परिक्षा शुल्क ही मागासवर्गीय उमेदवारांसाठी नवशे रुपये तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे.उपरोक्त आकारण्यात येणारी फी ही शहरी भागासह ग्रामीण भागातील उमेदवारांना परवडणारी नसुन या अमाप फी मुळे गरीब व होतकरू उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण व शहरातील अनेक उमेदवारांचे पालक हातावर आणून पानावर खाणारे आहे. त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी जिवाचा आटापिटा केला. एव्हढेच नाही तर मुलांना शासकीय नोकरी मिळावी हे त्यांचे एकमेव स्वप्न होते.परंतु उपरोक्त परीक्षेच्या या वाढीव शुल्क दरामुळे शहरी व ग्रामीण क्षेत्रातील अनेक विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहणार असल्याचे आता सर्वत्र बोलल्या जात आहे.

शासनाने त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सारासार विचार करता या परिक्षेसाठी ठेवण्यात आलेली फी त्वरित कमी करण्यात यावी अश्या आशयाची मागणी असणारे लेखी निवेदन समता सैनिक दल , डॉ .बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोशियशन पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक ) संबोधी फाॅऊडेशन ,मूल निवासी संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज बूधवार दि.५जूलैला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना देण्यात आले आहे.
या वेळी समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष धम्मदीप मेश्राम ,डॉ .बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोशिएशन जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष ॲड .पुनमचंद वाकडे ॲड. पूनम वाघमारे ,महेंद्र खंडाळे ,मिलींद खोब्रागडे ,नभा वाघमारे, संदीप वाघमारे ,ॲड .भीमराव रामटेके लता बारापात्रे ,ॲड .सोनाली मिलमीले, दिलीप पाटील ,शुभम रामटेके ,ॲड .चेतन दुर्गे ,ॲड. विशाल रंगारी, ॲड .किरण जवंजार ,ॲड .वैशाली टोंगे, ॲड. मनोज कवाडे ,सुरेश झाडे ॲड .मंगल दुर्गे ,ॲड .मधुरीका टिकले ,ॲड. नितीन खोब्रागडे ,ॲड. प्रिती उके ,स्नेहुल बनसोड, एस .के. बरके ,अभिजीत मेश्राम ,ॲड .हस्तक ,स्नेहुल गोंगले आदीं उपस्थित होते.