Home Breaking News Chandrapur @city • सहज सुचलं काव्यकुंजच्या सदस्य कवयित्री वर्षा शेंडे ...

Chandrapur @city • सहज सुचलं काव्यकुंजच्या सदस्य कवयित्री वर्षा शेंडे “आदर्श गुरूवर्य” उपाधीने सन्मानित !

505

Chandrapur @city
• सहज सुचलं काव्यकुंजच्या सदस्य कवयित्री वर्षा शेंडे “आदर्श गुरूवर्य” उपाधीने सन्मानित !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◽▪️ साहित्य क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी बद्दल अहमदनगर येथील काव्यकुंज साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंज गृपच्या सदस्य तथा चंद्रपूर जिल्ह्यातील शकरपूर निवासी सुपरिचित कवयित्री वर्षा अनिल शेंडे यांना नुकतेच “आदर्श गुरूवर्य”या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.दरम्यान सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिका तथा मार्गदर्शिका मेघा धोटे ,सहज सुचलंच्या सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असणा-या चंद्रपूरच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे, औद्योगिक भद्रावती नगरीच्या हिरकणी पुरस्कार प्राप्त कु.किरण साळवी, पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक व साहित्य क्षेत्रातील तथा सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त करणा-या विजया भांगे , जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रुति उरणकर, मूलच्या प्रख्यात कवयित्री स्मिता बांडगे, जागतिक पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री कु.अर्चना सुतार, राजूरा सहज सुचलंच काव्यकुंजच्या संयोजिका सरोज हिवरे, दुर्गापूर निवासी मंथना नन्नावरे या शिवाय नागपूर मनपाच्या माजी नगरसेविका नयना झाडे, राजू-याच्या अल्का सदावर्ते,कु.प्रियंका जगझाप,कु.सायली टोपकर, अश्विनी रायपूरे, ज्योत्स्ना कोडापे,कला कोडापे, भद्रावती नगरीच्या रजनी रणदिवे, नेरीच्या ज्योति मेहरकुरे, आदींनी वर्षा शेंडे यांचे मनस्वी अभिनंदन केले आहे.

▪️प्रख्यात कवयित्री वर्षा शेंडे यांना या पूर्वी देखील साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.तदवतंच त्यांनी महाराष्ट्रातील अनेक कवि संमेलनात आपला सहभाग नोंदविला आहे.