Home Breaking News Chandrapur dist@ news • हजारों नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ !...

Chandrapur dist@ news • हजारों नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ ! • औषधोंपचारासह विविध आजारांबाबत झाली जनजागृती !

231

Chandrapur dist@ news
• हजारों नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ !

• औषधोंपचारासह विविध आजारांबाबत झाली जनजागृती !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महानगर पालिकेच्या वतीने महाकाली काॅलरी येथील कॅन्टीन चौकात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात औषधोपचारासह विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी मनपा उपायुक्त अशोक गराडे, मनपा आरोग्य अधिकारी वनिता गर्गेलवार, डॉ. शुभांकर पिदुरकर, अतुल चटकी, डाॅ. लाहेरी, डाॅ .थेरा, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली विभाग महिला शहर संघटिका सविता दंडारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अधिवक्ता आघाडी अध्यक्ष अधिवक्ता परमहंस यादव, कल्पना शिंदे, रुपा परसराम, विमल काटकर, वैशाली मेश्राम, शंकर दंत्तूलवार, बबलू मेश्राम, माजी नगर सेवक पितांबर कश्यप, पुरुषोत्तम रेवेल्लीवार, अधिवक्ता राकेश निरवटला, धनंजय यादव यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या अन्य पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आमदार जोरगेवार यांच्या पूढाकाराने चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यातील तीन आरोग्य शिबीर संपन्न झाले आहे तर चौथे आरोग्य शिबिर महाकाली काॅलरी येथील कॅन्टीन चौकात घेण्यात आले. या शिबिरात येथील हजारों नागरिकांनी आरोग्य तपासणी केली आहे. यावेळी सदरहु रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. तपासणी करिता आलेल्या पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ई – गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात आले. तसेच सदरहु आयोजित शिबिरामध्ये विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिरामध्ये गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना पुढील उपचारा करिता सावंघी मेघे येथे दाखल केल्या जाणार आहे.