Ballarpur city@ news
• “श्री” गौरव परिवार चंद्रपूर व बल्हारपूर युवक काॅंग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने स्व. खा.बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न !
✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक
बल्लारपुर: प्राण वाचविण्यास रक्त हे महत्त्वाचे कार्य करते. रक्तदानासारखे दुसरे कुठलेही पुण्य कार्य या जगात नाही. ही भावना मनाशी जपत “श्री”गौरव परिवार चंद्रपूर व युवक काॅंग्रेस बल्हारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रामिण रुग्णालयात दिवंगत खा.बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त आज (दि.४ जुलैला) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरहु आयोजित शिबिराचे उद्घाटन चंद्रपूर “श्री” गौरव परिवारचे कुशल पुगलिया (माजी नगरसेवक)यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव चेतन गेडाम , प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सदस्य घनश्याम मूलचंदानी, इंटक अध्यक्ष शंकर दास जिल्हा महासचिव शंकर महाकाली,युवक कांग्रेस विधानसभाचे अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, एन.एस.यु.आयचे जिल्हाध्यक्ष शफाक शेख, माजी नगराध्यक्ष छाया मड़ावी, माजी नगर सेविका शोभा महतो,माजी न.प गट नेता देवेंद्र आर्य,माजी नगरसेवक भास्कर माकोड़े,माजी नगर सेवक विनोद आत्राम, सुधिर अमराज सामाजिक कार्यकर्ता नासिर(भुरू भाई)युवक कांग्रेस शहर अध्यक्ष अरविंद वर्मा,दानिश शेख, उपाध्यक्ष अजय रेड्डी,उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे,महासचिव अकरम शेख़,सचिव बशीर सिद्दीकी,कमलेश माकोड़े,अध्यक्ष करण कामटे,महेश माकोड़े, सोशल मीडिया अध्यक्ष संजय घुग्लोत,संदीप नाक्षिणे,अमोल काकड़े,राजू घुगरे,विजय वर्मा,रोहित खान,गोपाल कलवला,कार्तिक दरेकर,
सचिन कौरासे,आकाश दुर्गे,राहुल रामटेके, शब्बीर शेख, अभिलाष, इमरान शेख,आफताब पठान, सिधु बिमानवार, राजकरण निषाद,सुनील यादव, सुमित शेंडे, सुधिर बेजलवार शिवम लोनारे यांची उपस्थिती लाभली होती.
भविष्यात गरजुंना रक्ताची गरज भासू नये, यासाठी ४९ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून दिवंगत खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त खरी श्रद्धांजली वाहिली.शिबिर यशस्वी करण्यासाठी काॅंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


