Home Breaking News Chimur taluka@ news • काँग्रेस पक्षाचे विनोद रणदिवे यांचा भाजप पक्षात प्रवेश

Chimur taluka@ news • काँग्रेस पक्षाचे विनोद रणदिवे यांचा भाजप पक्षात प्रवेश

296

Chimur taluka@ news
• काँग्रेस पक्षाचे विनोद रणदिवे यांचा भाजप पक्षात प्रवेश

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चिमूर: चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या विकास कामांवर समाधान व्यक्त करीत आज खडसंगीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद रणदिवे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. या वेळी आ. बंटी भांगडीया यांच्यासह सरपंच गजानन गुळधे,माजी सभापती प्रकाश वाकडे,तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, न.प .माजी सभापती सतीश जाधव, सरपंच प्रफुल कोलते, राजू बोरकर कृ. उ .बा. समितीचे संचालक प्रकाश पोहनकर, संचालक दिनकरराव सिनगारे, सरपंच गजानन गुळद्ये, भाजयुमो तालुका अध्यक्ष बालू पिसे,मनी रॉय,प्रवीण गणोरकर,शैलेंद्र पाटील, पराग अंबादे,रवी लोहकरे,किशोर नेरलावर, भाज्युमो तालुका महामंत्री रोशन बनसोड निलेश गभने सागर भागवतकर नितेश दोडके लीलाधर बनसोड कलीम शेख आदीं भाजपची मंडळी उपस्थित होती .