Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न!

Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न!

337

Chandrapur dist@ news
• चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व तालुका/शहर/विधानसभा आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकत्याच झालेल्या फुटाफुटिनंतर चंद्रपुरात संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ऍड बाबासाहेब वासाडे होते,प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रा.जावेद पाशा, महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी,ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे,चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड,नुकतीच राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झालेले मुनाज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती, बैठकीला जिल्हाभरातील विधानसभा/तालुका/शहर/विधानसभा/जिल्हा पदाधिकारी,महीला/युवक तालुकाध्यक्ष,मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत बुथनिहाय संघटन बांधणीचा आढावा घेण्यात आला,नुकत्याच झालेल्या घडामोडींवर चर्चा झाल्या,जिह्यातील राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल शरदचंद्र पवार यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.