Home Breaking News Chandrapur city@ news • बसपा चंद्रपूर विधानसभा कार्यकर्ता मेळावा संपन्न

Chandrapur city@ news • बसपा चंद्रपूर विधानसभा कार्यकर्ता मेळावा संपन्न

71

Chandrapur city@ news
• बसपा चंद्रपूर विधानसभा कार्यकर्ता मेळावा संपन्न

✍️ग्यानिवंत गेडाम
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:चंद्रपूर विधानसभा,चंद्रपूर शहर आणि महिला आघाडी तर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा व (समीक्षा बैठक 10 जुलै 23 ला उत्साहपूर्वक पार पडला. भिमजी राजभर प्रदेश प्रभारी महाराष्ट्र प्रदेश आणि ॲड. डोंगरे प्रदेश प्रभारी महाराष्ट्र यांनी कार्यकर्त्या मेळाव्याला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशाचे सर्व सचिव त्याच प्रमाणे सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रमाला यशस्वी केले.कार्यक्रमाचे संचालन शहर अध्यक्ष शिरीषकुमार गोगुलवार प्रास्ताविक अविनाश वानखेडे व आभार प्रदर्शन प्रशांत रामटेके यांनी केले. या कार्यक्रमाला महिला आघाडी ने मेहनत घेतल्यामुळे महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. धर्मेश नकोसे प्रभारी चंद्रपूर यांचे उत्तम मार्गदर्शन केले. पदाधिकारी यांना प्रेरित करून कार्यक्रम यशस्वी करण्यात केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या नाजिया शेख यांनी बसपा मध्ये प्रवेश घेतला.