Home Breaking News Chandrapur city@ news • लाच मागणी प्रकरणात अडकला कोतवाल संजय कुळमेथे...

Chandrapur city@ news • लाच मागणी प्रकरणात अडकला कोतवाल संजय कुळमेथे • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांखाली मागत होता “तो” लाच !

250

Chandrapur city@ news
• लाच मागणी प्रकरणात अडकला कोतवाल संजय कुळमेथे

• वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांखाली मागत होता “तो” लाच !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:एका लाच मागणी प्रकरणात विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील पारडी येथील लाचखोर कोतवाल संजय बापूराव कुळमेथे यांस चंद्रपूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने अलगद जाळ्यात अडकवून त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.आज बुधवार दि.१२जूलैला एसबीच्या एका पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांखाली हा कोतवाल लाच मागून स्वताचे खिसे गरम करीत असल्याचे कोरपना तालुक्यातील जनतेत सर्वत्र बोलल्या जात आहे. या बाबतीत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते कि कोरपना येथील मुळ रहीवाशी असलेल्या तक्रारदाराच्या मुलांच्या नावाने वर्ग दोनची शेतजमीन होती ती जमीन वर्ग एक करायची होती.सदरहु लाचखोर कोतवालाने तक्रारदारास या कामासाठी चक्क दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली परंतु ही रक्कम देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नव्हती. शेवटी त्यांनी चंद्रपूर स्थित लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे दि.११जूलैला कार्यालय गाठले व या लाचखोराची रितसर तक्रार नोंदविली .एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता लाचखोराने लाच मागितल्याचे दिसून आले .त्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने आज बुधवारी या लाचखोराबाबत कोरपना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.उशिरा पर्यंत या प्रकरणा बाबत चौकशी सुरू होती .

सदरहु कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नागपूर तथा चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजूषा भोसले ,चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक जितेन्द्र गुरनूले , एसीबी पथकातील कर्मचारी रोशन चांदेकर , नरेशकुमार नन्नावरे, संदेश वाघमारे, सतिश शिडाम यांनी केली.

या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागासह अन्य शासकीय विभागांत एकच खळबळ उडाली आहे.लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे .याची पूरेपूर खात्री व जाणीव असतांना देखिल या लाचखोर कोतवालास लाचेचा मोह टाळता आला नाही.एसीबीने केलेल्या या कारवाईचे जनतेंनी स्वागत केले आहे.