Home Breaking News • महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट

• महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट

242

• महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येवून गेल्या.नागपूर येथील राजभवनात त्यांचे आगमन झाले.त्यावेळी अनेक आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली.त्या निवेदनात महत्वाचा विषय असा कि वर्तमान स्थितीत सुरू असलेला समान नागरी कायदाचा विचार केला पाहिजे व आदिवासी समाजास त्यातून वगळले जावे तसेच कुसुम ताई अलाम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नष्ट होणारी वनसंपत्तीचे रक्षण करण्याची मागणी करत सुरजागड व आदिवासी समाजास सुरक्षित ठेवण्यासाठी विनंती केली.

त्याचप्रमाणे आदिवासी महिला साहित्यिक, कलाकार यांना राज्यसभेची जागा द्यावी, लोकसभेत महिलांना जातीनिहाय 33% आरक्षण, आदिवासींच्या एकुण बजेट मध्ये महिलांसाठी भागिदारी असावी,ग्रामसभा मजबूत करणे,गोंडवाना विद्यापीठास संविधान सभेतील सदस्य जयपाल सिंग मुंडा यांचे नाव द्यावे,ट्रायबल एडवायजरी कमिटीची नियमित बैठक व्हावी.
राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन व्हावे.आदिवासी बहुल भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन पाठवावे इत्यादी मागण्या संदर्भात निवेदन दिले.महामहिम राष्ट्रपती गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित दीक्षांत समारंभाला हजर होत्या.या भेटीत विवेकजी भुवनसिंह नागभीरे, माया ईवनाते , शांता कुमरे, आकाश मडावी,लकी जाधव तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.