Home Breaking News Chandrapur taluka@ news • प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत एक रुपयात विमा...

Chandrapur taluka@ news • प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत एक रुपयात विमा करुन घ्यावा

45

Chandrapur taluka@ news
• प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत एक रुपयात विमा करुन घ्यावा

✍️ पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर: मौजा वेंडली तालुका चंद्रपूर येथे ई पीक पाहणी संदर्भात प्रात्यक्षिक करून ई पीक नोंदणी व पीक विमा काढण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.या वेळी तहसीलदार चंद्रपूर विजय पवार,नायब तहसीलदार सचिन खंडाळे,तलाठी पिपरी,पोलिस पाटील वेंडली व गावातील शेतकरी बंधू उपस्थीत होते.
तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की दिनांक 1 जुलै 2023 पासून खरीप हांगमा साठी ई पीक नोंदणी ला सुरुवात झाली असून सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ ई पीक नोंदणी करून घ्यावी.तसेच दिनांक 31 जुलै पर्यंत प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत 1 रुपयात पीक विमा करून घ्यावा.पीक विमा संदर्भात गावातील सर्व सेतू चालकांना या पूर्वीच ई पीक विमा बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
ई पीक नोंदणी न केल्यास सातबारा वर पिकाची नोंद नसल्यास भविष्यात नुकसान भरपाई मिळण्यास अडचण येऊ शकते सबब सर्व शेतकरी बंधूंनी तत्काळ ई पीक नोंदणी व पीक विमा करून प्रशासनास सहाय्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले.