Home Breaking News Bhadrawati taluka @ news • पुढील वर्षापासून तालुक्यातील विद्यार्थ्यांना  शालेय...

Bhadrawati taluka @ news • पुढील वर्षापासून तालुक्यातील विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य नियमितपणे वितरण : रविंद्र शिंदे • ट्रस्टचे उपक्रम “डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना” अभियानाअंतर्गत  प्रा. धनराज आस्वले यांनी वितरीत केले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

271

Bhadrawati taluka @ news

• पुढील वर्षापासून तालुक्यातील विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य नियमितपणे वितरण : रविंद्र शिंदे

• ट्रस्टचे उपक्रम “डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना” अभियानाअंतर्गत  प्रा. धनराज आस्वले यांनी वितरीत केले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती : स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर व्दारा राबविण्यात येत असलेले उपक्रम, आरोग्याविषयक श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, सामाजिक प्रबोधन विषयक विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, क्रिडा, खेळ स्पर्धा विषयक  कै. म. ना. पावडे क्रिडा स्पर्धा, गोरगरीब शेतकरी, अनाथ मुले, कोरोनामुळे मृत पावलेल्या पालकांची मुले यांच्या शिक्षणासंबंधी अनाथाची माय स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना तसेच ग्रामीण भागातील शाळेतील शालेय विद्यार्थी शालेय साहित्यांच्या अभावी शिक्षणात मागे पडू नये याकरीता ट्रस्टचे नविन उपक्रम “डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना” अभियानाअंतर्गत आज जिल्हा परीषद कोची येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरीत करण्यात आले.
          ग्रामपंचायत घोनाड येथील ग्रामपंचायत सदस्य कविता क्षिरसागर हे कोची या गावातील. कोची या शाळेतील विद्यार्थ्यांची व्यथा त्यांना बघवली नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यान जवळ पुरेसे शैक्षणिक साहित्य नव्हते. कविता क्षिरसागर हयांनी सरळ ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क केला व विद्यार्थ्यांची व्यथा कथन करीत कोरोणा काळात श्री गुरुजी फाऊंडेशन साहित्य वितरीत करायचे परंतु कोरोणामुळे हे तात्पुरते बंद झाले असे कळविले.
           रविंद्र शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले व श्री गुरुजी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रशांत कारेकर यांना संपर्क करीत संयुक्त विद्यमाने पुढील वर्षापासून शैक्षणिक साहित्य वितरणाचे कार्य सुरु करण्याचा मानस व्यक्त करीत तालुक्यातील गावखेडयातील विद्यार्थी हा शैक्षणिक साहित्याविना शिक्षणात मागे पडू नये व शैक्षणिक साहित्य वितरण करण्याच्या चांगल्या उपक्रमाची संयुक्त विद्यमाने सुरुवात करु असे मत व्यक्त केले.
          प्रा. धनराज आस्वले यांनी लगेचच “डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना” अभियानाअंतर्गत यावर्षी जि.प. प्राथमिक शाळा कोची येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे मान्य करीत आज (ता.14) रोजी वितरीत केले. याप्रसंगी प्रा. धनराज आस्वले यांनी उपस्थिती विद्यार्थी व पाहुण्यांना आपला खडतर शैक्षणिक प्रवासाचा अनुभव व सफलतेचा मार्गाचे कथन केले. श्री गुरुजी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कारेकर यांनी सुध्दा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पुढील वर्षापासून संयुक्तपणे साहित्य वितरण करण्याचे उपस्थिती विद्यार्थ्यांना वचन दिले.
        कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक शाळेच्या सहा. शिक्षीका माधुरी चिंचोलकर यांनी केले. शालेय साहित्य वितरण याप्रसंगी कोची-घोनाड सरपंच महेन्द्र भोयर, ग्रा.प.सदस्या कविता क्षिरसागर, लता वांढरे, भद्रावती कृ.उ.बा.समिती सभापती भास्कर ताजणे, शाळा समिती अध्यक्ष प्रविन आवारी, आंगणवाडी सेविका शालीनी जगताप, ललीता नवघरे, सोसायटी सदस्य सुनिल मोरे, धनराज भोयर, सामाजिक कार्यकर्ते गणेश जिवतोडे, अनुप कुटेमाटे, गावकरी विजय मत्ते, अभिषेक भोयर, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.