Home Breaking News Bhadrawati taluka @ news. • फिरते भंगार खरेदी करणाऱ्यांकडून भद्रावतीकरांची फसवणूक...

Bhadrawati taluka @ news. • फिरते भंगार खरेदी करणाऱ्यांकडून भद्रावतीकरांची फसवणूक • ग्राहक पंचायतचे पोलिस ठाणे, नगरपालिका आणि वजनकाटा विभागाला पत्र

247

Bhadrawati taluka @ news.

• फिरते भंगार खरेदी करणाऱ्यांकडून भद्रावतीकरांची फसवणूक

• ग्राहक पंचायतचे पोलिस ठाणे, नगरपालिका आणि वजनकाटा विभागाला पत्र

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती : शहरात गल्लोगल्ली भंगार, रद्दी खरेदीसाठी फिरते भंगार खरेदी करणाऱ्यांकडे वजनकाटा हा प्रमाणित केलेला नसतो. त्यामुळे भंगार किंवा रद्दी विकणाऱ्या वस्तुचा उचीत मोबदला मिळत नाही. यासंदर्भात अनेक नागरिकांच्या ग्राहक पंचायत कडे फोनव्दारे तक्रारी आल्या आहेत. शिवाय भंगार खरेदी करणाऱ्याला काट्याविषयी किंवा वजनाविषयी काही बोलले तर ते नागरिकांशी असभ्यवर्तनुक करतात. कधी कधी तर अंगावर येतात. भंगार, रद्दी फेकुन देतात. त्यामुळे भंगार खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर मान्यता देऊन, त्यांच्याकडे प्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स काटा असणे अनिवार्य केले पाहीजे. तसेच कोणी भंगार खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तीने नागरिकांसोबत असभ्यवर्तनुक केल्यास त्यावर त्वरित कारवाई झाली पाहीजे.

नगरपालिकेने भंगार खरेदी करणाऱ्याची रितसर नोंदणी करून परवाना प्रमाणपत्र द्यावे. विना परवाना भंगार खरेदी करत असल्यास अशा फिरते भंगार खरेदी करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. भंगार खरेदी करणाऱ्यांसाठी नगरपालिकेने प्रसिद्धी पत्र काढुन शहरातील फिरते भंगार खरेदी करणाऱ्यांना नगरपालिकेमध्ये नोंदणी करण्यासाठी माहीती प्रसारित करावी. सोबत विना परवाना भंगार खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडे नागरिकांनी भंगार विकु नये. जर अशे कोणी आढळल्यास अशा व्यक्ती ची माहीती त्वरित नगरपालिका, पोलिस ठाणे भद्रावती यांच्याकडे देण्यात यावी असे आवाहन v नगरपालिका भद्रावती ने करावे. अश्या मागणीचे पत्र पोलीस ठाणे भद्रावती, नगरपालिका भद्रावती आणि, वैधमापन शास्त्र विभाग, वरोरा यांना देण्यात आले आहे.

यावेळी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी वसंत वऱ्हाटे, वामन नामपल्लीवार, प्रविण चिमुरकर, सुदर्शन तनगुलवार यांची उपस्थिती होती.