Home Breaking News Varora taluka@ news • वरोरा येथे १० किलो गांजा जप्त

Varora taluka@ news • वरोरा येथे १० किलो गांजा जप्त

477

Varora taluka@ news
• वरोरा येथे १० किलो गांजा जप्त

• एका युवकाला अटक

चंद्रपूर :- पोलीस स्टेशन वरोरा येथे १४ जुलै रोजी गोपनीय माहीतीच्या आधारे, एक इसम आपले निळया रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ घेवुन जात असल्याची माहिती मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन वरोरा , पोलीस स्टेशन माजरी , स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी संयुक्तरित्या वरोरा येथील विश्रामगृह जवळ सापळा रचुन आरोपी रमेश शंकर नरवडे वय ४१ वर्ष रा. बगड खिडकी नाग मंदीर जवळ चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याच्या जवळ असलेल्या निळया रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगची झडती घेतली असता त्यात खाकी रंगाचे प्लास्टीक टेप पट्टीमध्ये गुंडाळलेले एकुन ५ नग बंडल ज्यात एकुन १०.२६४ किलो ग्रॅम गांजा किमत १,०२,६४० रू. चा अंमली पदार्थ मिळुन आल्याने सदरचा गांजा जप्त करून आरोपी विरूध्द एन. डी. पि.एस. कायदा कलम ८(क), २०(ब),II(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
सदर आरोपीचे पोलीस कोठडी घेवुन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी , अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, सहा पोलीस अधिक्षक आयुष नोपानी यांचे मार्गदर्शनात परि. पो. उप अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी योगेश रांजणकर पो. स्टे. वरोरा, सपोनि निलेश चवरे, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि किशोर मित्तरवार, नापोशि किशोर बोढे, पोअं. दिनेश मेश्राम, सुरज मेश्राम, फुलचंद लोधी तसेच पो.स्टे. माजरी येथील सपोनि अजितसिंग देवरे, पोउपनि भोजराम लांजेवार, नापोशि अनील बैठा व स्थागुशा येथील पोनि महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे यांचे पथकांनी पार पाडली.