Home Breaking News Ballarpur city@ news • भाजपा जिल्हा महिला आघाडी चे संघटनात्मक बैठक संपन्न

Ballarpur city@ news • भाजपा जिल्हा महिला आघाडी चे संघटनात्मक बैठक संपन्न

98

Ballarpur city@ news
• भाजपा जिल्हा महिला आघाडी चे संघटनात्मक बैठक संपन्न

✍️ संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- भारतीय जनता पार्टी महिला आघाडी बल्लारपूरच्या वतीने गोपाला पॅलेस बल्लारपूर येथे वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा , भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह यांच्या सहकार्याने भाजपा जिल्हा महिला मोर्चा चे संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश कडून पूर्व विदर्भ दौरा गडचिरोली पासून सुरुवात करण्यात आले असून गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, आणि आज चंद्रपूर जिल्हाच्या महिलांशी संवाद झाला. यावेळी जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, विविध आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर महानगर चंद्रपूर येथील महिलांशी संवाद साधण्यात आला. यावेळी संघटनात्मक आणि महिला मोर्चाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभियान या बद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी सदफ अन्सारी हिचा गोंडवाना युनिव्हर्सिटी सायन्स मध्ये सुवर्ण पदक राष्ट्रपती यांचे हस्ते पदक प्रदान करण्यात आले होते, तिचा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी वनिता ताई कानडे जेष्ठ नेत्या, अल्का आत्राम महामंत्री प्रदेश महिला मोर्चा , वैशाली चोपडे उपाध्यक्ष प्रदेश महिला , गीता कोंडेवाड उपाध्यक्ष प्रदेश महिला , रेखा डोळस सचिवप्रदेश , विद्या देवाळकर सचिव भाजपा, अंजली घोटेकर महानगर अध्यक्ष, वंदना आगरकटे महामंत्री, विजयालक्ष्मी डोहे महामंत्री, सैयरा शेख महामंत्री, रत्नमाला भोयर, वैशाली जोशी अध्यक्ष, शुभांगी शर्मा, बंदना सिन्हा उत्तर भारतीय महिला अध्यक्ष, आरती अक्केवार, सुंचुवार, जयश्री मोहुर्ले सह मोठया संख्येने महिला व पदाधिकारी उपस्थित होते.