Home Breaking News Chandrapur city@ news • नवोदित कलावंतांच्या कलागुणांना सदैव प्रोत्साहन देणारा महाराष्ट्रातील नामवंत...

Chandrapur city@ news • नवोदित कलावंतांच्या कलागुणांना सदैव प्रोत्साहन देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप -जेष्ठ साहित्यिका विजया भांगे यांचे मनोगत

81

Chandrapur city@ news
• नवोदित कलावंतांच्या कलागुणांना सदैव प्रोत्साहन देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप -जेष्ठ साहित्यिका विजया भांगे यांचे मनोगत

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप नवोदित कलावंतांना सदैव प्रोत्साहन देणारा असल्याचे मनोगत अमरावती जिल्ह्यातील पथ्रोडच्या सुपरिचित जेष्ठ साहित्यिका विजया भांगे यांनी आज बोलताना व्यक्त केले.दरम्यान सहज सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचेसह रंज्जू मोडक,वर्षा कोंगरे, किरण साळवी, अर्चना सुतार,सिमा पाटील, रजनी रणदिवे, श्रुति उरणकर, स्मिता बांडगे, मंथना नन्नावरे,विजया तत्वादी,सविता भोयर,अल्का सदावर्ते, वंदना हातगांवकर, स्मिता मेहेत्रे, संगिता पाटील, दिक्षा तेली , उज्वला नगराळे, वर्षा शेंडे सोनाली गोडाने, कल्याणी सरोदे आदीं सदस्यगणांचा उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यातून या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरून बोलताना केला

विशेषता नवोदित कलावंत व सहज सुचलंच्या सदस्या रश्मी पचारे, प्रियंका जगझाप, पायल दुपारे , सायली टोपकर, मेघा शेंडे , पुनम कोसरे यांचा आवर्जून उल्लेख करीत त्यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे.सहज सुचलंचा प्रदीर्घ प्रवास बघता त्यांनी सर्व सदस्यगणांचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे
गृप वरील जास्मिन शेख, सरोज हिवरे , श्रध्दा हिवरे , रसिका ढोणे , प्रतिभा चट्टे, यांना न विसरता त्यांनी आपल्या बोलण्यातून त्यांचे नांव काढले . विशेष उल्लेखनीय बाब अशी कि विजया भांगे या काही काळ महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या मार्गदर्शिका राहिल्या आहेत.त्यांचे योगदान सहज सुचलं साठी फार मोलाचे व अमुल्य ठरले आहे.हे कोणालाही विसरता येण्यासारखे नाही.काही वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अभियंता कु.रितू लोहकरे यांनी या व्हाॅटसअप गृपची मुहूर्तमेढ रोवली होती.बघता बघता हा गृप अल्पकालावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्याचे शेवटी भांगे म्हणाल्या.गृपवरील सर्वच कलावंतांची कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे.