Home Breaking News • मणिपूरची हिंसा थांबवून दोषींवर कारवाई करावी! • सेवानिवृत्त महिला तहसिलदार...

• मणिपूरची हिंसा थांबवून दोषींवर कारवाई करावी! • सेवानिवृत्त महिला तहसिलदार पुष्पलता कुमरे व जेष्ठ समाजसेविका कुसुम अलाम यांचे नेतृत्वाखाली निवेदन सादर!

248

• मणिपूरची हिंसा थांबवून दोषींवर कारवाई करावी!
• सेवानिवृत्त महिला तहसिलदार पुष्पलता कुमरे व जेष्ठ समाजसेविका कुसुम अलाम यांचे नेतृत्वाखाली निवेदन सादर!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचिरोली:दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही मणिपूर मधील अमानुष हिंसेंचे सत्र थांबत नाही.मोठ्या प्रमाणावर तेथे लोकशाहीची क्रूर थट्टा केली जात आहे.सद्यस्थितीत 4 मे 2023 चा एका मानवतेची हत्या करणारा एक विडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेला आहे.दोन आदिवासी महिलांना नग्न करून त्यांच्या शरीरासोबत खेळत आहेत.
त्या असहाय महिला केविलवाण्या होवून अक्षरशः रडत आहेत. पुरुष मानव सभ्यतेच्या सिमा ओलांडून आनंद घेत आहेत.या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने गडचिरोली जिल्हाधिका-यां मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती या शिवाय महाराष्ट्राचे राज्यपाल ,अनु जनजाती आयोग नवी दिल्ली यांना आज एक निवेदन पाठविण्यात आले.
भारतीय लोकशाहीच्या व संविधानाच्या विरोधी हे क्रूरकर्म आहे.सदरहु हिंसा थांबवून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे .यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार पुष्पलता कुमरे,जेष्ठ समाजसेविका कुसुम ताई अलाम,सुनिता उसेंडी,मालती पुडो,आरती कंगाले, शारदा मडावी, वनिता ताराम,फुलन उसेंडी,विद्या दुग्गा,कौशल्या गेडाम, अर्चना मडावी,माया उसेंडी व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.