Home Breaking News Chandrapur dist @news • चंद्रपूर पावसामुळे 804 घरांचे झाले नुकसान, आपदग्रस्तांना...

Chandrapur dist @news • चंद्रपूर पावसामुळे 804 घरांचे झाले नुकसान, आपदग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या! • अन्यथा आंदोलन छेडू -मनपाला राजू झोडेंचा इशारा !

108

Chandrapur dist @news

• चंद्रपूर पावसामुळे 804 घरांचे झाले नुकसान, आपदग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या!
• अन्यथा आंदोलन छेडू -मनपाला राजू झोडेंचा इशारा !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूर शहरात 1 जून पासून सुरू झालेल्या पावसामुळे 804 घरांचे नुकसान झाले तर मागील तीन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच 320 घरांमध्ये पाणी शिरले. तर चंद्रपूर शहरात एका घराचे पूर्णता नुकसान झाले असून 47 घरांचे अशंता नुकसान झाले आहे. उपरोक्त सर्व पीडितांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन त्यांच्या निवा-याची सोय करावी तसेच अन्नधान्य पूरवावे अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी यांनी आज केली आहे. अन्यथा मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करु असा इशारा राजू झोडे यांनी चंद्रपूर प्रशासनाला दिला आहे.

चंद्रपूर शहरात मंगळवारी एका दिवसातील अतिवृष्टीत 240 मिलीमीटर पाऊस पडला. यात 320 घरांमध्ये पाणी शिरले. चंद्रपूर शहरात एका घराचे पूर्णतः नुकसान झाले असून 47 घरांचे अशंता नुकसान झालेले आहे.
आतापर्यंत 1 जूनपासून झालेल्या पावसामुळे 804 घरांचे नुकसान झाले आहे. तशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या सर्वांचे पंचनामे तातडीने करून मदतकार्य करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहे. असे झोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे . पंचनामे करून नागरिकांना तात्पुरती स्वरूपात मदत दिली जाते. तेव्हा तात्पुरती रक्कम न देता त्यांना पुर्णतः नुकसान भरपाई देण्यात यावी व यापुढे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.