Home Breaking News Chandrapur@city news •भर पावसात आ. जोरगेवार “ऑन द स्पॉट”

Chandrapur@city news •भर पावसात आ. जोरगेवार “ऑन द स्पॉट”

92

Chandrapur@city news

•भर पावसात आ. जोरगेवार “ऑन द स्पॉट”

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:भर पावसात आज शुक्रवारला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या भागांची अधिका-यांना सोबत घेऊन पाहणी केली .यावेळी येथील नागरिकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु असून प्रशासन कामाला लागलेले आहे. नागरिकांनीही त्यांना सहकार्य करावे. तद्वतच अधिका-यांनीही या अति नुकसानग्रस्त भागांचे प्राथमिकतेने पंचनामे करुन अहवाल सादर करावा अशा आशयाच्या सुचना यावेळी त्यांनी अधिकारी वर्गांना केल्या . यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, शहर अभियंता महेश बारई, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त सचिन माकोडे, सिएटीपीएसचे अभियंता रामटेके, मनपाचे स्वच्छता निरिक्षक अमोल शेळके आदींची उपस्थिती होती.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामूळे बाबूपेठ, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी, जलनगर, रय्यतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी, नानाजी नगर वडगाव, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, वृंदावन नगर, इंडस्ट्रियल वार्ड, नेहरुनगर, उत्तमनगर, सरकारनगर या भागातील नागरीवस्तीमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठे नूकसाण झाले आहे. दरम्यान आमदार जोरगेवार यांच्या वतीने परिस्थितीचा आढावा घेतल्या जात आहे. आमदार जोरगेवार यांनी सदर विषय अधिवेशनात मांडल्या नंतर नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत अधिका-यांना आवश्यक त्या सुचनाही केल्या आहे.
तर आज आमदार जोरगेवार यांनी प्रत्यक्ष या भागांची पाहणी करत नुकसानीची माहिती घेतली आहे. यावेळी त्यांनी पावसामुळे घरांची पडझड झालेल्या नागरिकांचीही भेट घेतली.शासनाकडून मिळणारी मदत लवकर मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. बेघर झालेल्या नागरिकांना मदत केंद्रात ठेवण्याचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. त्यांनी उपस्थित अधिका-यांना या भागात पाणी साचण्या मागचे कारण शोधुन यावर उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहे. अधिका-यांनीही या भागातील नाल्यांची पाहणी केली असून सदरहु नाले खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी लवकर प्रस्ताव तयार करणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसातही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांशीही त्यांनी संवाद साधत परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी सिएसटीपीएस, मनपा प्रशासण आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांनी संयुक्त बैठक घेत राष्ट्रवादी नगर मधून जात असलेल्या नाल्याच्या बंदोबस्तासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहे. जल नगर येथील रेल्वे लाईन जवळील नाल्यांचे रुंदीकरण करण्याच्या सुचना ही त्यांनी यावेळी केल्या आहे. जल नगर येथील नाल्यांचा तात्काळ उपसा करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी अधिका-यांना केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमूख सविता दंडारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, कविता निखारे, निलिमा वनकर, आशा देशमुख, प्रेमीला बावणे, शांता धांडे, शहर संघटक विश्वजीत शाहा, युवा नेते अमोल शेंडे, शिक्षक आघाडी प्रमूख प्रतिक शिवणकर, करणसिंग बैस, विलास सोमलवार, अधिवक्ता राम मेंडे, हरमन जोसेफ, अधिवक्ता परमहंस यादव, नकुल वासमवार, कार्तिक बोरेवार, बादल हजारे, आदींची उपस्थिती होती.