Home Breaking News ◽काव्यकुंज ” पाऊस “◽

◽काव्यकुंज ” पाऊस “◽

250

◽काव्यकुंज ” पाऊस “◽

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◻️♦️◻️मेघ दाटता
सरी कोसळी
वाहे भरून
नदी मोकळी.(१)

◻️♦️◻️पाऊस धारा
चिंब करती
भाव मनीचे
नेत्री भरती.(२)

◻️♦️◻️येता पाऊस
वाटे गारवा
झाडाआडून
गाई पारवा.(३)

◻️♦️◻️भिजून गेले
वेडे हे मन
आसुसलेले
भेटीस तन.(४)

◻️♦️◻️रोमांचकारी
प्रीतीचा गंध
क्षणात पळे
मन बेधुंद.(५)

◻️♦️◻️बघता धारा
आलीय धुंदी
आठवता तू
मन बेधुंदी.(६)

दोघे मिळुनी
घेऊ की जरा
पावसातला
आनंद खरा.(७)

🔸◽🔸वैशाली राऊत, सहज सुचलं काव्यकुंज सदस्य
🔸◻️🔸नागपूर🔸◻️🔸