Home Breaking News Chandrapur dist@ news • हिराचंद बोरकुटेंची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

Chandrapur dist@ news • हिराचंद बोरकुटेंची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

157

Chandrapur dist@ news
• हिराचंद बोरकुटेंची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक सदस्य,पक्षाचे जेष्ठ नेते,पुरोगामी विचारवंत,तथा ओबीसी चळवळीतील एक आद्य कार्यकर्ते अधिवक्ता हिराचंद बोरकुटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या “प्रदेश सरचिटणीसपदी” नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने तथा राष्ट्रवादी पार्टीचे राज्याचे नेते आ.अनिल देशमुख यांच्या शिफारसी नुसार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.
चंद्रपूरचे अधिवक्ता हिराचंद बोरकुटे यांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी त्यांना आज नियुक्ती पत्र दिले आहे.अनेकांनी बोरकुटे यांचे नियुक्तीचे स्वागत करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.