Home Breaking News Bhadrawati taluka:@news • कर्नाटक एम्टा खुल्या कोळसाखानीतील कोळसा चोरीला प्रतिबंध लावा....

Bhadrawati taluka:@news • कर्नाटक एम्टा खुल्या कोळसाखानीतील कोळसा चोरीला प्रतिबंध लावा. आकाश वानखेडे यांचे प्रशासनाला निवेदन.

192

Bhadrawati taluka:@news
• कर्नाटक एम्टा खुल्या कोळसाखानीतील कोळसा चोरीला प्रतिबंध लावा. आकाश वानखेडे यांचे प्रशासनाला निवेदन.

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती – कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीतून निघणारा कोळसा. कर्नाटक राज्यात वीज निर्मितीसाठी पाठवला जातो. हा कोळसा कर्नाटक मध्ये रेल्वेने पाठविण्यासाठी विमला साइडिंग ताडाळी येथे जमा केला जातो. कर्नाटक ऐ्म्टा ते विमला साईडिंग येथे ट्रक द्वारे येणारा कोळशाची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. या चोरीवर आळा घालून कोळसा चोरट्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . कर्नाटक एम्टा कंपनीने स्वतः तयार केलेली माजरी रेल्वे साइडिंगवरून कोळशाची रेल्वे द्वारे वाहतूक कर्नाटक राज्यात होत होती. आता माजरी रेल्वे साईडींग रेल्वे वाहतुकीस योग्य नसल्याचे कारण पुढे करून गेल्या काही दिवसापासून कर्नाटक ऐम्टा खुल्या कोळसा खाणीचा कोळसा विमला रेल्वे साईडिंग ताडाळी येथे जमा करून रेल्वेने कर्नाटक राज्यात पाठविण्यात येत आहे. मात्र या विमला साईडिंगवर कर्नाटक ऐम्टा कंपनीतून ट्रक द्वार निघणाऱ्या कोळशाची गेल्या कित्येक दिवसापासून चोरी होत आहे. या प्रकारामध्ये गुंडशाही , राजकीय व्यक्तीचा तसेच कर्नाटका एम्टा कंपनी अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. या कोळसा चोरीमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे येथील कोळसा चोरीवर नियंत्रण आणून कोळसा चोरीत सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.