Home Breaking News Bhadravati taluka@ news • भिम आर्मी, वंचित बहुजन आघाडी,उलगुल्हान संघटना च्या तर्फे...

Bhadravati taluka@ news • भिम आर्मी, वंचित बहुजन आघाडी,उलगुल्हान संघटना च्या तर्फे चंद्रपुरात संभाजी भिडे चा विरोध • देशद्रोही संभाजी भिडे चा निषेध असो..निषेध असो च्या घोषणा बाजीने चंद्रपुर दुमदुमले • राजू झोडे सह वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यानां पोलिसांनी केली अटक

337

Bhadravati taluka@ news
• भिम आर्मी, वंचित बहुजन आघाडी,उलगुल्हान संघटना च्या तर्फे चंद्रपुरात संभाजी भिडे चा विरोध

• देशद्रोही संभाजी भिडे चा निषेध असो..निषेध असो च्या घोषणा बाजीने चंद्रपुर दुमदुमले

• राजू झोडे सह वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यानां पोलिसांनी केली अटक

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती- चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती.याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची सभा उधळून लावली, याच वेळी पोलिसांनी जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले व सुटका केली.यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असून नुकतेच महाराष्ट्र व संपूर्ण भारताची बदनामी केली. संभाजी भिडे हे देशद्रोही असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.दरम्यान चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती.याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अग्रसेन भवन परिसरात जाऊन जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांची सभा उधळून लावली.त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले व सुटका केली आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, जयदीप खोब्रागडे,सदानंद करमनकर,भिम आर्मी चे जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र रायपुरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.